अहमदनगर - विश्वनायक पैगंबर मोहंमद(स.) यांच्या जयंतीनिमित्त सरवरे आलम कमिटी आणि एफ.जे ग्रुपच्यावतीने त्यांच्या विचारांचे (फ्लेक्सद्वारे) प्रदर्शनाचे आयोजन शनिवार दि.8 रोजी सायं. 7 वा. विश्वनायक सभागृह, जुनाबार, अहमदनगर येथे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून, यावेळी इंजि.अब्दुल वाजेद कादरी याचे प्रवचन होणार आहे. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. प्रवचनानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते भंडार्याचा शुभारंभ करण्यात येईल.
या कार्यक्रमास आयुक्त पंकज जावळे, हाजी करीम हुंडेकरी, संभाजी कदम, हाजी नजीर अहमद, पै.अफजल शेख, बाळासाहेब बोराटे, अविनाश घुले, दत्ता कावरे, समद खान, मुजाहिद कुरेशी भा, शेख मुदस्सर, उबेद शेख, शेख इमरान जहांगीर, डॉ.रिजवान अहमद, परेश लोखंडे, डॉ.सईद अ. अजीज, साहेबान जहागिरदार, बाबा जाफर खान आदि उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाबासाहब जहागिरदार, जावदे खान, शेख शकिल यांनी केले आहे.
Post a Comment