विश्वनायक पैगंबर मोहंमद (स.) यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी प्रदर्शनाचे आयोजन

अहमदनगर - विश्वनायक पैगंबर मोहंमद(स.) यांच्या जयंतीनिमित्त सरवरे आलम कमिटी आणि एफ.जे ग्रुपच्यावतीने त्यांच्या विचारांचे (फ्लेक्सद्वारे) प्रदर्शनाचे आयोजन शनिवार दि.8 रोजी सायं. 7 वा. विश्वनायक सभागृह, जुनाबार, अहमदनगर येथे करण्यात आले आहे. 
या प्रदर्शनाचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून, यावेळी  इंजि.अब्दुल वाजेद कादरी याचे प्रवचन होणार आहे. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. प्रवचनानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते भंडार्‍याचा शुभारंभ करण्यात येईल.
या कार्यक्रमास आयुक्त पंकज जावळे, हाजी करीम हुंडेकरी, संभाजी कदम, हाजी नजीर अहमद, पै.अफजल शेख, बाळासाहेब बोराटे, अविनाश घुले, दत्ता कावरे, समद खान, मुजाहिद कुरेशी भा, शेख मुदस्सर, उबेद शेख, शेख इमरान जहांगीर, डॉ.रिजवान अहमद, परेश लोखंडे, डॉ.सईद अ. अजीज, साहेबान जहागिरदार, बाबा जाफर खान आदि उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाबासाहब जहागिरदार, जावदे खान, शेख शकिल यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा