महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांसाठी झटणारे युवा नेते राहुल कुदनर

*महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना कोणी जर हात लावाल तर याद राखाःराहुल कुदनर?*

*राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्कः महाराष्ट्र*

महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा लोकसंख्येच्या दृष्टीने 2 नंबर लागतो या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये एक मेंढपाळ कुटुंबामध्ये बिरोबा देवाचे भक्त बिराजी आबाजी कुदनर यांचे नातू व कैलासवासी बाळासाहेब बिराजी कुदनर यांचे चिरंजीव म्हणजे माननीय राहुल कुदनर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1992 रोजी संगमनेर तालुक्यातील डिग्रस या गावी झाला. त्यांचे मूळ गाव संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील शिंदोडी हे होय त्यांची आई गं.भा. उषाबाई बाळासाहेब कुदनर होय ती एक विधवा महिला असताना आपल्या तीन मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे म्हणून त्यांना वस्तीग्रहामध्ये टाकण्यात आले.

त्यामध्ये राहुल कुदनर यांचे  दहावीपर्यंत शिक्षण सारडा वस्तीग्रहामध्ये झाले तर अकरावी बारावी राहुल कुदनर यांनी हॉटेलमध्ये वेटर चे काम करून केली त्यानंतर त्यांनी पुढचे शिक्षण मराठा विद्या प्रसारक सेवा संघाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथून घेतले बीए राज्यशास्त्र स्पेशल ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुढे शिक्षण हे कायम ठेवले. त्यांची आई गं.भा. उषाबाई हिला आपल्या पतीच्या निधनानंतर खूप संघर्ष करावा लागला तरीपण तिने आपल्या तिन्ही मुलांना शिकवले. त्यामध्ये मुलगा राहुल मोठा असल्याने आणि एकुलता एक असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती लहानपणी मुलगा राहुल चार वर्षाचा असताना वडील देवा घरी गेले आई एकटी पाठीमागे दोन छोट्या बहिणी सर्व जबाबदारी राहुल पडली वडील देवा घरी गेल्यानंतर राहून ने आपले संपूर्ण शिक्षण वस्तीग्रह मध्ये राहून पूर्ण केले. बीए राज्यशास्त्र मधून 2016 साली पदवी संपादन केली. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये वसुली अधिकारी म्हणून दोन वर्ष नोकरी केली. आपण आपण समाजामध्ये जन्म घेतला म्हणजे समाजाचे काहीतरी देणे घेणे लागते म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करायला त्यांनी सुरुवात केली. पाठीमागे कोणताही वारसा नसताना त्यांनी सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील एक सामाजिक कार्यातून आपली स्वतःची ओळख निर्माण केली वेगवेगळ्या ठिकाणी समाजाची मेळावे भरवणे समाज प्रबोधन करणे सर्व बहुजन समाजासाठी आरक्षणासाठी झटणे समाजाला एकत्रित आणण्यासाठी खूप संघर्ष केला समाज संघटित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि असे प्रयत्न करणारे माणसे कमी जन्माले येतात म्हणून त्यांचे महाराष्ट्रातील बहुजन समाजामध्ये खूप मोलाचे काम आहे.

त्यानंतर 2018 साली पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करायचे त्यांनी ठरवले सुरुवातीला ग्रामीण पत्रकार संघात तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले त्यानंतर त्यांची ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर त्यांच्या कामाचा आढावा पाहून धनगर समाजाचे मुखपत्र साप्ताहिक धनगर शक्ती या वृत्तपत्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि या वृत्तपत्राचे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली पुढे त्यांनी चांगले काम केल्यामुळे ते नाशिक विभागीय संपादक या पदावर रुजू झाले. एक समाजाचे वृत्तपत्र असल्यामुळे त्यांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व धर्माच्या व जातीच्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. तसेच या वृत्तपत्रांमध्ये काम करत असताना त्यांनी स्वतःच्या गावांमध्ये शासनाचा बंद पडलेला प्रथमता दवाखाना चालू केला तसेच गावातील काही रस्त्यांची कामे केली त्यांनी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जे काम खूप दिवसापासून बंद होते ते काम त्यांनी पूर्ण केले ते काम म्हणजे संगमनेर तालुक्यातील शिंदोडी चिकलठाण ते साकुर फाटा या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आणि त्या विभागाचे इन्चार्ज वाकचौरे व अभियंता जाधव साहेब यांनी त्यांच्या निवेदन स्वीकारून कामाला लगेच सुरुवात केली तसेच या रस्त्याचे कामकाज अंदाजपत्रक प्रमाणे झाले पाहिजे असे त्यांनी ठेकेदार एन के गाडे यांना सांगितले व त्यांनी ते मान्य केले आणि या कामाची रक्कम 4 कोटी 95 लाख रुपये होती आणि हे काम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आणि हे काम त्यांनी केल्यामुळे त्यांचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे वजन वाढले आणि समाज  त्यांना एक सिंगम पत्रकार म्हणून ओळखायला लागले. त्यानंतर त्यांचे काम पाहून धनगर शक्तीचे संपादक यांनी उपसंपादक म्हणून जबाबदारी त्यांच्यावर सोपवली महाराष्ट्रामध्ये धनगर शक्ती साप्ताहिक वाढवण्यासाठी राहुल कुदनर यांनी खूप मेहनत केली.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये होणारे  मेंढपाळावर अन्याय हल्ले अत्याचार थांबवण्यासाठी खूप संघर्ष केला व सरकारच्या विरोधात आंदोलने केले. महाराष्ट्रातील कोणत्याही मेंढपाळाला कुठेही काही मदत लागली तर राहुल कुदनर तिथे धावून जायचे आणि आपले मीडियाच्या माध्यमातून सर्वांना ते मदत करायचे त्यांनी मेंढपाळ बांधवांसाठी महाराष्ट्रामध्ये फक्त मेंढपाळ धनगर शासन ही संघटना काढली आणि या संघटनेच्या माध्यमातून व आपले मीडियाच्या माध्यमातून मेंढपाळांना लागेल ती मदत करण्याचे त्यांनी मेंढपाळ बांधवांना आश्वासन दिले व ते त्यांनी पूर्ण केले आता त्यांच्या कामामुळे महाराष्ट्रामधील मेंढपा बांधवांवर होणारे अन्याय हल्ले अत्याचार कमी झाले आहे म्हणून महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांनी मेंढपाळांचा अवलिया ,मेंढपाळांचे दैवत म्हणून त्यांना संबोधले तसेच एक सिंघम पत्रकार म्हणून मेंढपाळ बांधवांनी त्यांना पदवी बहाल केली. 

त्यानंतर एक समाजाचे वृत्तपत्र असल्यामुळे ते धनगर शक्ती वृत्तपत्रातून बाहेर पडले त्यांनी निर्णय घेतला की आपण जर एका समाजाच्या वृत्तपत्राबरोबर काम केले तर आपल्याला बाकीच्या समाजाबरोबर काम करता येणार नाही म्हणून त्यांनी स्वतःचा मीडिया स्थापन केला तो मीडिया स्थापन करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला आणि त्या मीडियाचे नाव म्हणजे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियासमूह हे होय.

या मीडियाची स्थापना 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी केली आणि आपल्या स्वतःच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक जाळ पसरवलं आणि मोजून दहा महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 950 पत्रकार त्यांनी तयार केले. तसेच त्यांच्या मीडियाचे काम इतर राज्यांमध्ये सुद्धा हिंदीमध्ये चालू केले आणि या इतर राज्यांमध्ये 150 च्या आसपास पत्रकार आहे आणि राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये काम करतो पण इतर राज्यांमध्ये हिंदीमध्ये सुद्धा काम करतो त्यामुळे या मीडियाची ताकद मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2021-22 या मीडियाला सामाजिक कार्याचा पुरस्कार पण बाहाल झाला. राहुल कुदनर यांचे महाराष्ट्रामध्ये काम चांगले असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासन, केंद्र शासन तसेच महाराष्ट्रातील असणारे पक्ष संघटना यांचे अनेक पुरस्कार त्यांना भेटले तसेच मीडियाला एक चांगला मिडीया म्हणून ओळख निर्माण झाली.

राहुल कुदनर यांचे नाव ऐकल्यानंतर सरकारी अधिकारी, काही भ्रष्ट अधिकारी यांचे धाबे ढसाळायला लागतात. जे अधिकारी काम चुकारपणा करतात त्यांना जागेवर आणण्याचे काम राहुल कुदनर आपल्या मीडियाच्या माध्यमातून करतात त्यामुळे अधिकारी लोक राहुल कुदनर यांना एक दबंग पत्रकार असल्यामुळे खूप घाबरतात त्यांचं नाव म्हणजे एक महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे सामान्य नेतृत्व होय नेहमी समाजासाठी धडपड करणारे आणि आपल्या पाठीमागे कोणताही वारसा हक्क नसताना सर्वांना न्याय कसा भेटेल हीच त्यांची भावना नक्की असते आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोणाला जरी कुठेही काही अडचण आली तर प्रथम राहुल कुदनर पत्रकार यांना फोन येतो. आणि राहुल कुदनर त्या व्यक्तीला नक्कीच न्याय देतात.आपले मीडियाच्या माध्यमातून समाजांवर होणारे अन्याय हल्ले अत्याचार थांबवणे तसेच कोणताही समाज असो सर्व समाजाला न्याय देण्याचे काम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाच्या माध्यमातून केले जाते तसेच राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहामध्ये काम करणारे सर्व पत्रकारांना मोफत प्रशिक्षण दिले जाते .तसेच ओरिजनल आयडी कार्ड, नियुक्तीपत्र, मीडियाची लेस, स्टिकर ,लोगो अशा प्रकारचे साहित्य दिले जाते. तसेच बातम्या कशा तयार करायचे, लिहायच्या कशा, ब्राईट कशी घ्यायची ,बूम कसा पकडायचा हे सर्व शिक्षण राहुल कुदनर हे आपल्या सर्व मीडियाच्या पत्रकारांना मोफत देत असतात. तसेच महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व प्रशासकीय विभागामध्ये सर्व पत्रकारांना प्रशिक्षण देऊन आपला मीडिया महाराष्ट्रात कशाप्रकारे मोठा होईल हे ते सर्वप्रथम पाहत असतात. 

त्यांचे स्वप्न आहे की 2030 पर्यंत महाराष्ट्रामध्ये मीडियाचे 5000 पत्रकार कसे तयार होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाची ताकद कशी निर्माण होईल त्यांनी पाहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण होवो असे हे धडाडी नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कोणताही वारसा हक्क नसताना निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहुल कुदनर या नावाला खूप मोठी किंमत आहे आणि अशी माणसे समाजामध्ये कमी जन्माला येतात त्यामुळे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.

शुभेच्छुकःमखदुम सोसायटी अहमदनगर 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा