विविध स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातून अनेक पुस्तक उपलब्ध असून अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी उर्दू माध्यमाचे पुस्तक उपलब्ध होणे ही एक मोठे यश आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले.
बेलापुर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील शिक्षिका मेहरुन्निसा खान यांनी उर्दू माध्यमातून तयार केलेले नवोदय विद्यालय मार्गदर्शक पुस्तिका याचे प्रकाशन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचे शुभहस्ते पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले तर प्रसंगी भास्कर पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी होत्या.
श्री.पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले, संपूर्ण देशामध्ये कोविड काळात सर्वांचे शैक्षणिक दारे बंद झालेले असताना जिल्ह्यातील शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात नवनिर्मिती विविध प्रयोग केले. दरम्यान स्वतःच्या घरात नियतीने स्वतःचा मुल हिरावल्यानंतरही आपल्या दशेला शिक्षणाची साथ देत विद्यार्थ्यांचे हित जोपासत भविष्यकाळात विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असे पुस्तक निर्मितीचे काम करीत नवीन दिशा दिली.एकूणच जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील शिक्षकांचे कार्य हे आवर्जून उल्लेख करावा असेच आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक पुस्तकांची उपलब्धता होणे आवश्यक होते.पुस्तक निर्मितीमध्ये उर्दू माध्यमातील शिक्षक पुढे येत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे यावेळी श्री.पाटील म्हणाले. श्रीरामपूर तालुका एक उपक्रमशील व शैक्षणिक क्षेत्राला दिशा देणारा तालुका असून त्यांचे खाते प्रमुख साईलता सामलेटी यांनी सुरू केलेला जागर स्री - शक्तीचा कार्यक्रम देखील दिशादर्शक आहे.
गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढताना शिक्षक सतत विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून विविध प्रयोग करत असल्याचे म्हटले.उर्दू माध्यमातील शिक्षकांनी लिहिते होण्याचे आवाहन केले. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी पुस्तक निर्मितीचे करताना शिक्षकांना प्रोत्साहन देत असलेबाबत प्रशासनाचे आभार मानत उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या विविध अडचणींकडे शिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमाम सय्यद यांनी केले. पुस्तक निर्मिती मागील हेतू स्पष्ट करताना लेखिका मेहरुन्निसा खान यांनी म्हटले,मराठी माध्यमातील विद्यार्थी नवोदय स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भाग घेत असताना उर्दू माध्यमातील विद्यार्थी केवळ साहित्य उपलब्ध नसताना इच्छा असूनही या स्पर्धात्मक परिषद सामोरे जाऊ शकत नव्हते हे लक्षात आल्याने कोविड काळाचा सदुपयोग करत पतीच्या पाठिंब्याने तसेच सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने हे पुस्तक तयार करू शकले.
कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण,शिक्षणविस्तार अधिकारी अलीम शेख,कारले मॅडम, केंद्रप्रमुख मंगल गायकवाड, मुख्याध्यापक जलील शेख,इमाम सय्यद,उस्मान तांबोळी,जाकीर सय्यद,अनिस शेख,मोहम्मद बदर शेख,नासिर शेख व अनेक शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील बागवान यांनी केले तर जाकीर सय्यद यांनी आभार प्रदर्शन केले.
إرسال تعليق