शब्दगंध च्या महाविद्यालयीन काव्यलेखन स्पर्धेत कार्तिक झेंडे प्रथम

अहमदनगर  - ‘शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेत कार्तिक रामदास झेंडे (न्यु आर्ट्स कॉलेज,अहमदनगर) यास प्रथम क्रमांक,कु.प्रियांका अनिल सुंबे (काकासाहेब म्हस्के ज्यू.कॉलेज,बोल्हेगाव) द्वितीय तर आविष्कार राजकुमार इकडे (के.के.वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय,नाशिक ) यास तृतीय क्रमांक जाहिर करण्यात येत आहे’, अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
     शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवयित्री शर्मिला गोसावी,कार्यवाह,कवी सुभाष सोनवणे,जेष्ठ साहित्यिक,सहसचिव अजयकुमार पवार या परीक्षकांनी दिलेला सविस्तर निकाल पुढील प्रमाणे                                                                        प्रथम   : कार्तिक झेंडे (न्यु आर्ट्स कॉलेज,अहमदनगर),                                              द्वितीय : कु.प्रियांका सुंबे (काकासाहेब म्हस्के ज्यू.कॉलेज,बोल्हेगाव)                               तृतीय   : आविष्कार इकडे (के.के.वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय,नाशिक), उत्तेजनार्थ : कु.शितल भाऊसाहेब दैतकार (महाराजा गायकवाड कॉलेज,मालेगाव)                                                       कु.अनुष्का योगेश पंडित (पेमराज सारडा महाविद्यालय,नगर),                                                    पुष्कर मुकेश सोनवणे (विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे ),                               कु.कोमल बाप्पुसाहेब कांदळकर (आर्ट्स,कॉमर्स कॉलेज,बेलापूर), 
      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज,नर्सिंग, मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी तसेच सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रमाचे ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु.३०००, रु.२००० व रु.१००० ची पुस्तके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना रुपये पाचशे ची पुस्तके व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते लवकरच देण्यात येणार आहेत.पारितोषिक प्राप्त विद्यार्था साहित्यिकांचे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत,राजेंद्र फंड, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, स्वाती ठूबे, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, ज्ञानदेव पांडुळे, सुनीलकुमार धस,राजेंद्र पवार व किशोर डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा