मिलिंद अष्टीवकर कार्याध्यक्ष तर मन्सूरभाई परिषदेचे नवे सरचिटणीस

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची तर सरचिटणीसपदी नगरचे ज्येष्ठ पत्रकार मन्सूरभाई शेख यांची निवड झाली आहे.. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत ते या पदावर असतील.. रायगडच्या पत्रकाराला परिषदेचे कार्याध्यक्ष होण्याचा बहुमान दुसरयांदा मिळत आहे.. यापुर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्ष होत्या.. 
मिलिंद अष्टीवकर रोहा येथून लोकमतचे काम करतात.. गेली २० वर्षे ते परिषदेशी जोडलेले आहेत.. कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आदि पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.. परिषदेच्यावतीने ते अधिस्वीकृती समितीवर देखील होते..पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांच्या हक्कासाठीच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी नेहमीच बिणीच्या शिलेदाराची भूमिका पार पाडली आहे.. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो.. मुंबई - गोवा महामार्गासाठी च्या कोकणातील पत्रकारांच्या लढ्यात त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक होती.. एक स्पष्ट वक्ता, निर्भिड पत्रकार, चांगला संघटक अशी त्यांची ओळख आहे. 
मन्सूरभाई शेख हे नगरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत.. गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत असलेल्या मन्सूरभाई किमान पंधरा वर्षे परिषदेशी जोडलेले आहेत.. परिषदेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो .. नगर प्रेस क्लबचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.. एक मनमिळाऊ, मितभाषी पत्रकार आणि चांगला संघटक असलेल्या मन्सूरभाई यांचे सवत:चे युट्यूब चॅनल आहे... तत्पूर्वी त्यांनी विविध दैनिकाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.. 
दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.. 
मिलिंद अष्टीवकर आणि मन्सूरभाई यांच्या कार्यकाळात परिषद अधिक पत्रकाराभिमूख होईल आणि पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा