विमान व हॅलीकॅप्टर भाडेतत्वावर अहमदनगर मध्य उपलब्ध

*अंभोरा येथील “ कराळे पाटील हेली-बे ” मुळे नगरच्या पर्यटन विकासाला मिळणार मोठा हातभार - ॲड. सत्यजीत कराळे पाटील*

*कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उदघाटन व हेली बे हेली पोर्टचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी संपन्न*

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर पासून जवळच असलेल्या अंभोरा येथे कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन झाले असून त्याच ठिकाणी कराळे पाटील हेली बे हा हेलिपॉर्ट साकारण्यात येणार आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टर राईड चा अनुभव घेता येणार आहे. त्या सोबत एअर ऍम्ब्युलन्स , एअर फायर हेलिकॉप्टर, प्रायव्हेट चार्टर उपलब्ध होणार असून यामळे बीड, नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे असा विश्वास फाउंडर चेअरमन ॲड सत्यजीत शिवाजीराव कराळे पाटील, को फाउंडर आणि सी ई ओ सागर सुभाष आमले यांनी व्यक्त केला आहे. 
मान्यवरांच्या उपस्थतीत हा सोहळा पार पडला. यावेळी जेष्ठ विधिज्ञ शिवाजीराव अण्णा कराळे पाटील, सुभाषनाना मोहन आमले, सौ. आरती कराळे पाटील, सौ उज्वला आमले यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या कॉर्पोरट लोगोचे अनावरण देखील करण्यात आले. 
अंभोरा येथे सात एकराच्या परिसरात हे अंबेश्वर कृषिवन रिसॉर्ट साकारण्यात आले असून त्याच ठिकाणी हा हेली बे हेली पोर्ट तयार होणार आहे. यासाठी एक मोठा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी आर ६६, बेल २०६, बेल ४०७ हे हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. या ठिकाणी बर्थडे, प्री वेडिंग, विवाह समारंभ, कॉर्पोरट प्रोग्राम्स, फ्लॉवर शॉवर, हेली बे वरून शिर्डी दर्शन, नगर-पुणे, नगर-औरंगाबाद, नगर-नाशिक हेलिकॅाप्टर  व विमान सेवा, जिथे विमानतळ आहे त्या प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट विमान, प्रायव्हेट जेट उपल्बध करून देणार आहेत, या कंपनी द्वारे सर्वसामान्य मुलांना पायलट होता येईल. तसेच अनेकांना रेजगार उपलब्ध होईल. देशातल्या विविध विमानतळावरून कंपनी एव्हिएशन क्षेत्रातील सर्व काही सेवा उपलब्ध करून देणार आहे. तरी या सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्या संचालकांनी केला आहे. 
रेश्मा कटारिया पब्लिसिटी मॅनेजर  
९९२१०६४५६९

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा