इतिहास अभ्यास मंडळावर डॉ. अशोक कानडे यांची निवड

पाथर्डी /अहमदनगर -   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्टोचे) अधिकृत उमेदवार म्हणून सलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभाग प्रमुखांच्या गटातून मानव विज्ञान विद्या शाखेंतर्गत इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून प्राध्यापक डॉ. अशोक कानडे निवडून आले आहेत. डॉ. कानडे हे बाबुजी आव्हाड महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सहसचिव, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि बाबुजी आव्हाड व्याख्यानमालेचे समन्वयक म्हणून ते कार्य करत आहेत. त्यांनी महाविद्यालयात अनेक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून 25 वे अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले होते. विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये  सहभाग घेऊन अनेक पेपरचे वाचन त्यांनी केलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरांचा अभ्यास या विषयांमध्ये त्यांनी पीएच.डी. संपादन केलेली आहे. त्यांचे दोन ग्रंथ प्रकाशित झालेले असून सामाजिक क्षेत्रामध्ये ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या या निवडीबद्दल पार्थ प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड साहेब, उपाध्यक्ष अँड. सुरेशराव आव्हाड साहेब, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्ष्या डॉ. अरुणा मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे साहेब, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे साहेब, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र फसले साहेब, स्पुक्टोचे अध्यक्ष डॉ. के.एल. गिरमकर, डॉ. किसन अंबाडे, डॉ. दिगंबर सोनवणे, डॉ. राजाराम सोनवणे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा