पाथर्डी / अहमदनगर : “इतिहासाच्या संशोधनातून नवीन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते,ती सकारात्मक ऊर्जा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची भूमिका ग्रंथालय करत आहेत ही आनंदाची बाब आहे,” असे प्रतिपादन बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी अविनाश मंत्री हे होते.यावेळी डॉ.अशोक कानडे यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल, डॉ.कैलास दौंड यांचा ' अगंतुकाचे स्वगते ' या काव्यसंग्रहास चंद्रपूर स्थित शब्दांगण राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल,बाबूजी आव्हाड महाविद्यालया चे ग्रंथपाल डॉ.किरण गुलदगड,आनंद कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.अशोक वैद्य,एम.एम. नि-हाळी विद्यालयाचे डॉ.विठ्ठल दहिफळे यांना पी.एच.डी.पदवी मिळाल्याबद्दल, दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.राजकुमार घुले यांचे ' श्री संत रत्नमाला ' व डॉ.संजय उदमले यांचे 'विधीमंडळातील बबनराव ढाकणे' हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल, सामाजिक कार्याची दखल घेत हाजी हुमायून भाई आतार यांचा दिल्ली येथे सन्मान झाल्याबद्दल,राजेंद्र उदारे यांचा अमरावती येथील शेतकरी संमेलनात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल, डॉ.सुहास उरणकर यांची निमा संघटनेच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
“संघर्ष आणि प्रेरणा याचे अतूट नाते आहे.संघर्षातूनच प्रेरणा निर्माण होते. पत्रकारांनी अनिष्ट शोधून काढून समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे” असे मत जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले आणि सत्कारमूर्तींना समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत शब्दगंध चे पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ.अनिल पानखडे यांनी केले.महादेव कौसे यांनी सूत्रसंचालन केले तर भाऊसाहेब गोरे यांनी आभार मानले.यावेळी डॉ.अशोक डोळस, डॉ.अरुण राख, सुरेश मिसाळ,दिगंबर गाडे,सुरेश दहिफळे,छबुराव फुंदे,विजय शिंदे,राजेंद्र कोटकर, प्रा.अजय पालवे,सुनिल मरकड,आनंद सानप,अशोक गाडेकर, आकाश कचरे, प्रा.जनार्दन बोडखे,प्रा.संतराम साबळे,शशिकांत काळोखे,नितीन एडके, सौ.गीता गाडेकर, सौ.संगिता गाडेकर, सौ.अनिता कानडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध साहित्यिक परिषद चे उपाध्यक्ष भारत गाडेकर,चंद्रकांत उदागे,पियुष गाडेकर,पत्रकार राजेंद्र चव्हाण,संदीप शेवाळे,संदीप भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले .
Post a Comment