शिक्षणक्षेत्रात महिलांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षणाचे आद्यपुरस्कर्ते महात्मा फुले या दाम्पत्यासोबतच सातत्याने काम करणाऱ्या फातिमा शेख यांची १९५ वी जयंती अमानत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणार्या तालुक्यातील कर्तुत्वत्वान महिला शिक्षिकांना पुरस्कार देऊन साजरी करण्यात आली.
पतसंस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी चेअरमन याकूबभाई बागवान होते.याप्रसंगी व्हा.चेअरमन इब्राहिम कुरेशी,साजिद मिर्झा,जलील शेख,हनिफ तांबोळी,समीर बागवान,ख्वाजा बागवान, प्राध्यापक उमर बागवान,शाखाधिकारी सुलताना शेख,वैशाली वारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी तज्ज्ञ संचालक शकील बागवान यांनी यानिमित्त फातिमा शेख यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकताना फातिमा शेख या मुस्लिम समाजातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सर्व मुलींचे आदर्श बनून समोर आल्याचे म्हटले.ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांना शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी फातिमा शेख यांनी त्यांचे भाऊ जफर शेख यांच्या माध्यमातून प्रसंगी जागा उपलब्ध करून देऊन फुले यांच्या शैक्षणिक कार्यात मोठे योगदान देऊन समाज सुधारण्याच्या या महान कार्यात स्वतःला झोकून दिले.मुस्लिम समाजातील मुलींसाठी सावित्रीबाई सोबतच फातिमा शेख या आदर्श ठरत आहेत.
याप्रसंगी उर्दू माध्यमातील शिक्षणात स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या खासदार गोविंदराव आदिक अँग्लो उर्दू हायस्कुलच्या सायरा बागवान,नगरपालिका उर्दू शाळेच्या वहिदा सय्यद,बेलापूर उर्दू जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या महेजबीन बागवान,देवळाली उर्दू शाळेच्या हबीबा शेख यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी याकूबभाई बागवान, उमर बागवान, हनिफ तांबोळी, पुरस्कार प्राप्त शिक्षिका महेजबीन बागवान यांची भाषणे झाली.
सूत्रसंचालन साजिद मिर्झा यांनी केले तर आभार प्रदर्शन उमर बागवान यांनी केले.
Post a Comment