अहमदनगर - राष्ट्रमाता जिजाऊंचे वडिल लखुजी राजे जाधव व शहाजीराजे भोसले यांचे वडिल मालोजी राजे भोसले यांचे बराच काळ अहमदनगर शहरात वास्तव्य होते. त्यामुळे जिजाऊंचे बालपण सिंदखेडाराजा नंतर अहमदनगर शहरात गेले. मुख्य म्हणजे विवाहानंतर सुद्धा जिजाऊंचे वास्तव्य अनेक वर्षे अहमदनगर शहरातील अर्बन बँक येथे असणार्य मालोजी पॅलेस येथे गेले. त्या नियमित तेथील अमृतेश्वर मंदिरात पूजा करण्यास जात. राष्ट्रमाता जिजाऊ व महाराणी येसूबाई यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या अहमदनगरच्या भुमीतील महिलांनी पावन स्पर्शाने पवित्र झालेल्याया भुमीतील महिलांनी आपल्या मुलांवर शिवचरित्राचे संस्कार करावेत, अशी मौलिक माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमति संपुर्णाताई सावंत यांनी दिली.जिजाऊ ब्रिगेड च्यावतीने जिजाऊ जयंतीनिमित्त ऐतिहासिक वस्तू संग्रहालय येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संपूर्णाताई सावंत, शहराध्यक्ष सुरेखा कडूस, सचिव वंदना निघूट, अॅड. स्वाती जाधव, अॅड. अनुराधा येवले महिला बालकल्याण समिती सदस्या , मायाताई जगताप, रेणू दौड, आशा गायकवाड, मंगल शिरसाट, शारदा पवार, सुवर्णा पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शहराध्यक्ष सुरेखा कडूस यांनी जिजाऊंच्याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. आजही समाजात काम करतांना स्त्रीयांचा आदर केला पाहिजे. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यासारख्या महिलांचे राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान राहिले आहे. जिजाऊ ब्रिगेडही महिलांच्या उन्नत्तीसाठी कार्य करत आहे. त्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
إرسال تعليق