राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर जगण विकणा-या माणसांच्या कविता,धगधगते तळघर,रानजुई,नवरत्न,वळणवाटा, इलेक्शन बिलेक्शन, चा समावेश

अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने २०२१ चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ”  जगण विकणा-या माणसांच्या कविता,धगधगते तळघर,रानजुई, नव रत्न, वळण वाटा, इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकांना जाहिर करण्यात येत असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून “ राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा ” आयोजित करण्यात येतात.अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत कवयित्री  शर्मिला गोसावी, सुभाष सोनवणे,प्रा.डॉ.अशोक कानडे,राजेंद्र फंड,बबनराव गिरी अजयकुमार पवार,किशोर डोंगरे, भारत गाडेकर यांनी परीक्षक म्हणून निकाल जाहिर केला.
२०२१ चे “राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ”जगण विकणा-या माणसांच्या कविता - हबीब भंडारे,औरंगाबाद,धगधगते तळघर - उषा हिंगोणेकर जळगाव ( काव्यसंग्रह ), रानजुई - डॉ.बी.जी.शेखर पाटील ( कथासंग्रह ),वळण वाटा – प्रा.विश्वनाथ जाधव, आटपाडी (आत्मचरित्र ),इलेक्शन बिलेक्शन – हिरालाल पगडाल,संगमनेर (संकीर्ण ),नव रत्न – उत्तम बोडखे, आष्टी ( लेखसंग्रह ),दलित कवितेची निर्मिती प्रक्रिया – डॉ.कैलास वानखडे,अकोले ( समीक्षाग्रंथ ),मित्रांची गोष्ट –किरण भावसार, नाशिक, किलबिल – भारती सावंत ( बाल वाड्मय) २०२१ चे “जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ”जोडव – दिनकरराव आरगडे, सौदाळा ( कादंबरी ), उसावल्या सांजवेळी – स्वाती पाटील, कर्जत  शब्दात गुंतले मी - मनीषा देवगुणे, नगर ( काव्यसंग्रह ), भाऊबंदकी – अनिल चिंदे ( कथासंग्रह)
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल,बुके व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.पुरस्कार विजेत्यांचे प्रमोद देशपांडे,प्राचार्य शिवाजीराव देवढे,प्राचार्य चंद्रकांत भोसले, चंद्रकांत पालवे,प्रा.डॉ.शंकरराव चव्हाण, संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, राजेंद्र चोभे,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा