श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पंचायत समिती शिक्षण विभागाच्या साधन व्यक्ती श्रीमती वंदना गिरमे मॅडम तसेच बालसंगोपन योजनेचे मार्गदर्शक श्री मुकुंद टंकसाळे सर यांच्या हस्ते सावित्रीबाईंचे प्रतिमा पूजन करण्यात आले.कुमारी लायबा मुनीर शेख या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने सावित्रीबाईची जीवनकथा ओघवत्या शैलीत सांगितली.इयत्ता सहावीच्या कुमारी तबशिरा आरीफ बागवान व मुबशशिरा शेरू शेख यांनी सावित्रीबाई व फातिमा शेख यांचा संवाद सादर केला.शिक्षिका श्रीमती शाहीन शेख यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
या निमित्ताने बालसंगोपन योजनेच्या पालकांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.मुकुंद टंकसाळे व वंदना गिरमे यांनी बालसंगोपन योजनेची सविस्तर माहिती पालकांना दिली.बाल संगोपन योजनेच्या शाळेच्या समन्वयक सौ बशिरा अमजद पठाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी केले. आसिफ मुर्तजा यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जुनेद काकर यांनी मानले.शाळा क्रमांक नऊच्या मुख्याध्यापिका नाझिया शेख यांचे सह पालक वर्ग याप्रसंगी उपस्थित होते.
Post a Comment