श्रीरामपूर ही साहित्य आणि सेवावृत्तीची कर्तृत्वभूमी - सुनील गोसावी

श्रीरामपूर (वार्ताहर ): *श्रीरामपूर ही साहित्य आणि सेवाभावाची कर्तृत्वशील भूमी असून प्रकाश किरण प्रतिष्ठानचा मिळालेला पुरस्कार साहित्यिक वाटचालीसाठी  प्रेरणादायी राहिलं* असे मत अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केले. 
 येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान तर्फे २०२२ चे पुरस्कार प्रकाश कुलथे यांच्या स्नेहप्रकाश कार्यालयात प्रदान करण्यात आले,त्याप्रसंगी सुनील गोसावी बोलत होते.स्वागत, प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष लेविन भोसले यांनी केले.सुनील गोसावी यांनी लिहिलेल्या 'आठवणींचा डोह ' या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांच्या हस्ते सुनील गोसावी यांना प्रदान करण्यात आला तर श्रीराम बोबडे यांच्या 'संघर्ष श्रीरामाचा ' या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पत्रकार प्रकाश कुलथे आणि डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'आठवणींचा डोह ', 'संघर्ष श्रीरामाचा 'या दजेदार, प्रबोधनकारी पुस्तकाचे महत्व सांगून गुणवत्तापूर्ण पुस्तकांना मिळालेले हे पुरस्कार मौलिक स्वरूपाचे असल्याचे सांगितले. कवी आनंदा साळवे, स्वामीराज कुलथे यांनी पुरस्कारकर्ते सुनील गोसावी आणि श्रीराम बोबडे यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
          पुढे बोलताना सुनील गोसावी म्हणाले की, श्रीरामपूर ही कर्तृत्वशील  लोकांची भूमी असून येथील पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी राहील. प्रकाश किरण प्रतिष्ठानच्या वतीने मिळालेला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार हा आठवणींच्या डोहा बरोबरच शब्दगंध साहित्यिक चळवळीला बळ देणारा ठरणाणारा आहे. या पुरस्काराने साहित्यिक काम वाढवण्याचे जबाबदारी वाढली असून ती निश्चितच पूर्ण करण्यात येईल, यापूर्वी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा मिळालेला पुरस्कार व आजचा हा किरण प्रतिष्ठानचा पुरस्कार दोन्हींचा ही सन्मानाने स्वीकार करत असून साहित्यिक चळवळ सर्वांना सोबत घेऊन वाढवली जाईल असे सांगितले.  श्रीराम बोबडे यांनी संस्थेच्या वतीने साहित्य, साहित्यिकांचा खरा सन्मान केला जातो, हे वेगळेपण महत्वाचे असल्याचे सांगून पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ. बाबुराव उपाध्ये, आनंदा साळवे यांचे साहित्यिक योगदान प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर स्वामीराज कुलथे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा