पत्रकार दिनाचे औचित्य साधून क.जे.सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात रंगमंच (स्टेज) भूमिपूजन व पत्रकारांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

पत्रकारांचा गौरव हा हिंद सेवा
मंडळाचा बहुमान-संजय जोशी

पत्रकार दिनाचे औचित्य साधून क.जे.सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात रंगमंच (स्टेज) भूमिपूजन व पत्रकारांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

*शौकतभाई शेख श्रीरामपूर*
हिंद सेवा मंडळ अहमदनगर चे
करमशी जेठाभाई सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) श्रीरामपूर यांच्यावतीने क.जे.सोमैया कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वृत्तपत्र श्रृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत येथील दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार करण नवले यांच्या हस्ते तथा स्वामी विवेकानंद तरुण मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे यांच्या अध्यक्षतेखाली रंगमंच (स्टेज) चे भूमिपूजन तथा पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी पत्रकार करण नवले, संजय जोशी, दत्तात्रय साबळे, विजय नगरकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,हिंद सेवा मंडळाचे सहसचिव रणजीत श्रीगोड, उपाध्यक्ष बापुसाहेब जौक,सोमैया महाविद्यालयाचे  चेअरमन विजय नगरकर, सोमैया हायस्कूलचे चेअरमन संजय छल्लारे,रात्र प्रशाळेचे चेअरमन चंद्रकांत संगम समवेत पत्रकार बांधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी म्हणाले की, पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांचे हस्ते मंडळाच्या क.जे. सोमैया कनिष्ठ महाविद्यालयाचा  रंगमंच (स्टेज) भूमीपजन पत्रकारांचे हस्ते झाले ही भूषणावह असून‌ अशा प्रकारे गौरव हिंद सेवा मंडळाचा बहुमान असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी,अशोक गाडेकर,मनोज आगे,प्रदिप आहेर, रवी भागवत, नागेशभाई सावंत,शौकतभाई शेख,ॲड. मोहसिन शेख,जयेश सावंत माणिकराव जाधव, आदिनाथ जोशी,आदी पत्रकारांना यांचा भेट वस्तू देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 या प्रसंगी हिंद सेवा मंडळाचे सहसचिव रणजीत श्रीगोड, उपाध्यक्ष बापुसाहेब जौक, सोमैया महाविद्यालयाचे  चेअरमन विजय नगरकर, सोमैया हायस्कूलचे चेअरमन संजय छल्लारे ,रात्र प्रशालेचे चेअरमन चंद्रकांत संगम,मोहनशेठ कुकरेंजा, प्राचार्य भुषण गोपाळे, नितीन गगे, विजय सेवक,आदिक जोशी,सचिन मुळे,बाळासाहेब ओझा,सौ.विद्या कुलकर्णी, कल्याण लाकडे,उमेश तांबडे, कर्नावट सर, नंदकुमार अंभोरे, किशोर फुणगे,नवनाथ जंगले, सुजाता मालपाठक, सतिश म्हसे, निलेश क्षीरसागर,आनंद जोशी, योगेश शेटे,अविनाश राऊत,रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे सर,निलेश क्षीरसागर, नवनाथ जंगले,चित्रा कांबळे, किशोर फुणगे,नवनीत जोशी, चोभे सर,सुरेंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली जाधव व सुवर्णा कुमावत  यांनी केले,अध्यक्षीय सूचना शेरअली सय्यद सर यांनी मांडली व अनुमोदन मेहेत्रे मॅडम यांनी दिले, शेवटी चंद्रकला जाधव यांनी आभार मानले.पत्रकार सत्कार कार्यक्रमास उमेश तांबडे ॲन्ड असोसिएटसच्यावतीने विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा