या सोहळ्याला ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जागरूक नागरिक मंच चे अध्यक्ष सुहास भाई मुळे, राजसाई फायनान्स चे राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, शिक्षिका सुरेखा घोलप, बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष अनिल इवळे, मंदार सटाणकर, नाभिक समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभा सटाणकर आदी आवर्जून उपस्थित होते.
श्री सटाणकर यांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेत प्रथमच प्रेस क्लबचा पुरस्कार प्राप्त झाला.या पुरस्कारामुळे त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.आमदार संग्राम भैय्या जगतापसह उपस्थित मान्यवर आणि पत्रकारांनी सटाणकर यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सटाणकर यांनी संपूर्ण आयुष्य ध्येयाने पत्रकारिता करीत कधीही स्वार्थ आणि पैशाला महत्त्व दिले नाही.
पत्रकारितेत सामाजिक जाणीव ठेवून, साहेब - शेठजी पेक्षा सामान्य, उपेक्षितांना न्याय मिळवून दिला.बातमीशी प्रामाणिक राहून निर्भिडपणे प्रश्न मांडले व समाजांचे प्रबोधन केले.हा पुरस्कार सटाणकर यांच्या तत्वनिष्ठ स्वभावाला समर्पित आहे.
खरं जगासमोर उशिरा येतं पण, किती प्रयत्न केले तरी ते लपून राहत नाही.हिरा झाकला तरी चमकत राहतो तेच आज सटाणकर यांच्या पुरस्कारामुळे सिध्द झाले, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शामराव वाघस्कर यांनी अभिनंदन करताना व्यक्त केली.
सोशल मीडिया तून अनेक मान्यवरांनी व नागरीकांनी प्रतिक्रिया देत सटाणकर यांचे अभिनंदन केले आहे.
राजेश सटाणकर (मो.92714 59465)
Post a Comment