अमदनगर प्रेस क्लबचा स्व.भास्करराव डिक्कर स्मृती पत्रकार पुरस्कार राजेश सटाणकर यांना प्रदान

अहमदनगर - अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा स्व.भास्करराव डिक्कर स्मृती पत्रकार पुरस्कार राजेश सटाणकर यांना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,आमदार संग्राम जगताप , जिल्हा माहिती  अधिकारी रविंद्र ठाकुर, वक्ते डॉ संजय कळमकर,आयोजक प्रेस क्लब अध्यक्ष शिवाजी शिर्के, राजेंद्र झोंड, अशोक निंबाळकर आदी मान्यवर व्यासपीठावर  होते.

     या सोहळ्याला ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जागरूक नागरिक मंच चे अध्यक्ष सुहास भाई मुळे, राजसाई फायनान्स चे राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, शिक्षिका सुरेखा घोलप, बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष अनिल इवळे, मंदार सटाणकर, नाभिक समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभा सटाणकर आदी आवर्जून उपस्थित होते.

     श्री सटाणकर यांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेत प्रथमच प्रेस क्लबचा पुरस्कार प्राप्त झाला.या पुरस्कारामुळे त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.आमदार संग्राम भैय्या जगतापसह उपस्थित मान्यवर आणि पत्रकारांनी सटाणकर यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सटाणकर यांनी संपूर्ण आयुष्य ध्येयाने पत्रकारिता करीत कधीही स्वार्थ आणि पैशाला महत्त्व दिले नाही.

    पत्रकारितेत सामाजिक जाणीव ठेवून, साहेब - शेठजी पेक्षा सामान्य, उपेक्षितांना न्याय मिळवून दिला.बातमीशी प्रामाणिक राहून निर्भिडपणे प्रश्न मांडले व समाजांचे प्रबोधन केले.हा पुरस्कार सटाणकर यांच्या तत्वनिष्ठ स्वभावाला समर्पित आहे.

      खरं जगासमोर उशिरा येतं पण, किती प्रयत्न केले तरी ते लपून राहत नाही.हिरा झाकला तरी चमकत राहतो तेच आज सटाणकर यांच्या पुरस्कारामुळे सिध्द झाले, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शामराव वाघस्कर यांनी अभिनंदन करताना व्यक्त केली.

      सोशल मीडिया तून अनेक मान्यवरांनी व नागरीकांनी प्रतिक्रिया देत सटाणकर यांचे अभिनंदन केले आहे.

 राजेश सटाणकर (मो.92714 59465)

 


Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा