अहमदनगर - प्रजासत्ताक दिनानिमित्त अल करम सोसायटीच्या अल करम हॉस्पिटलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार दि.26 जानेवरी रोजी रामचंद्र खुंटू येथील महेश मंगल कार्यालय व अहमदनगर किल्ला च्या आत पार्किंग शेजारी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती तौफीक तांबोली यांनी दिली.
समाजाची मोठी गरज असलेला हा उपक्रम अल करम तर्फे मागील अनेक वर्षापासून सतत चालू आहे. व त्याला लोकांचा प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणात मिळतो. तरी या वर्षीही रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन अल करम हॉस्पिटलच्या वतीने शेर अली शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 98 60 70 80 16 या नंबर वर संपर्क साधावे.
إرسال تعليق