अहमदनगर, ता. ६ ः स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक पत्रकारांनी केलेल्या सूचनांमुळे शासन आणि प्रशासनास मार्गदर्शन मिळाले. नगरमध्ये तरवडीसारख्या खेड्यात राहून मुकुंदराव पाटील यांनी केलेली सत्यशोधकी पत्रकारिता आदर्शवत आहे. माझ्या कार्यकाळातही मी अनेक योग्य सूचनांची अंमलबजावणी केली आहे. आगामी काळातही मार्गदर्शकाची भूमिका कायम ठेवून पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार संग्राम जगताप, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, उपाध्यक्ष राजेंद्र झोंड, सचिव अशोक निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आमदार जगताप म्हणाले, आज प्रत्येकजण व्यक्त होऊ शकतो. प्रत्येकाचे स्वतंत्र चॅनलही आहे. परंतु या डिजीटल मीडियाने विश्वासार्हता गमवली आहे. अनेक समस्यांना तोंड देत प्रिंट मीडिया टिकून आहे. पत्रकारांच्या घरासह विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच अग्रभागी असेल. मात्र, त्यासाठी पाठपुरावा करायला हवा.साहित्यिक संजय कळमकर यांनी मिश्किल शैलीत बदलत्या पत्रकारितेचा आढावा घेतला. सोशल मीडियामुळे चिंतेचेही जागतिकीकरण झाले आहे. या जागतिक चिंता आपल्या घरात घुसल्या आहेत. या काळातही वर्तमानपत्रांनी आपली जबाबदारी नेटाने पार पाडली आहे. पत्रकारांचे अल्पवेतनसारखे प्रश्न गंभीर आहेत.
प्रास्तविकात अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी गेल्या तीन वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. दिवंगत पत्रकारांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार, आरोग्य शिबिर, कोरोना काळात राबवलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले. आभार सचिव निंबाळकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप रोडे, निशांत दातीर, ज्ञानेश दुधाडे, जयंत कुलकर्णी, अशोक झोटिंग, मनोज मोतियानी आदींनी परिश्रम घेतले.
'पत्रकारांना घरे, मागा तर खरे'
जिल्हाधिकारी म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांना काम करताना नेहमीच माध्यमांचे सहकार्य लाभते. नगर जिल्ह्याला मोठी परंपरा आहे. आगामी काळातही ती जपली पाहिजे. सर्व समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांनाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांनी सोलापूरसारखा पाठपुरावा केल्यास त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावता येईल. परंतु त्यासाठी मागणी करायला हवी.
---------------------
स्व. भास्करराव डिक्कर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ पत्रकार राजेश सटाणकर यांना पुरस्कार व पुरस्कारार्थीची नावे- स्व. दा. प. आपटे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- मिलींद देखणे (सामना), स्व. आचार्य गुंदेचा स्मृती पत्रकारीता पुरस्कार- राजेंद्र झोंड (पुण्यनगरी), स्व. सुधीर मेहता स्मृती पत्रकारीता पुरस्कार- नंदकुमार सातपुते (ज्येष्ठ पत्रकार), स्व. नंदकुमार सोनार स्मृती पत्रकारीता पुरस्कार- महेश देशपांडे महाराज, स्व. प्रकाश भंडारे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- रियाजभाई शेख (दर्शक), स्व. प्रकाश सावेडकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- दीपक मेढे (ज्येष्ठ पत्रकार), स्व. पांडुरंग रायकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- सुनील भोंगळ (एबीपी माझा), स्व. जितेंद्र आगरवाल स्मृती पत्रकारीता पुरस्कार- दत्ता इंगळे (छायाचित्रकार), स्व. रमाकांत बर्डे स्मृती पत्रकारीता पुरस्कार - प्र. के. कुलकर्णी, स्व. गोपाळराव मिरीकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- नरहर कोरडे (ज्येष्ठ पत्रकार). आकाशवाणीसाठी बातमीदारीबद्दल विशेष सन्मान- अनिल पाटील.
यावर्षीचे पुरस्कारप्राप्त पत्रकार- अरुण नवथर (सकाळ), अण्णासाहेब नवथर (लोकमत), बंडू पवार (दिव्य मराठी), ज्ञानेश दुधाडे (सार्वमत), समीर दाणी (पुण्यनगरी), गोरख शिंदे (पुढारी), अशोक सोनवणे (लोकमंथन), जयंत कुलकर्णी (प्रभात), सुर्यकांत नेटके (ऍग्रोवन), सुर्यकांत वरकड (लोकआवाज), रामदास ढमाले (अजिंक्य भारत), अशोक झोटींग (मराठवाडा केसरी), करण नवले (राष्ट्र सह्याद्री), दिलीप वाघमारे (केसरी), सुरेश वाडेकर (समाचार), निशांत दातीर (नवाकाळ), सुनील हारदे (नवा मराठा), सुहास देशपांडे (नगर सह्याद्री), मनोज मोतीयानी (अहमदनगर घडामोडी), रमेश देशपांडे (नगर टाईम्स), सुभाष चिंधे (नगर स्वतंत्र), राम नळकांडे (नगरी दवंडी), विठ्ठल शिंदे (राज आनंद), आबीद खान (मखदूम), गजेंद्र राशीनकर (पराक्रमी), विजय सांगळे (आकर्षण), पप्पू जहागीरदार (अहमदनगर एक्सप्रेस) यांना. व्हीडिओग्राफीद्वारे उत्कृष्ट बातमीदारीबद्दल नीलेश आगरकर यांना विशेष पुरस्काराने गौरविले.
Post a Comment