अहमदनगर - अहमदनगर प्रेस क्लबच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘बेस्ट रिपोर्टर पुरस्कार’ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते आबीद दुलेखान यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ.अमोल बागुल आदि मान्यवर उपस्थित होते.
आबीद खान यांना यापुर्वी महाराष्ट्र शासनाचा हारुन रशिद उर्दु पत्रकारीता 2010 राज्यस्तरीय पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आबीद खान यांनी तब्बल 33 वर्षांपासून अहमदनगर जिल्हयातील एकमेव उर्दू पेपर मखदुम नियमित काढतात व महाराष्ट्र व देशातील अनेक विविध उर्दू वृत्तपत्रांमध्ये लिखान करत आहेत. मखदुम रमज़ान अंकच्या माध्यमातुन विविध ऐतिहासिक विषयावर अनेक विशेषांक प्रसिद्ध करुन इतिहासाला चालना देण्याचे कार्य केले आहे.
या पुरस्कारबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment