अल-करम हाॅस्पीटलच्या रक्तदान शिबीरात 150 जणांचे रक्तदान

--------------------------------------------------------
युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे-आ.संग्राम जगताप
--------------------------------------------------------
अहमदनगर-रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्यांची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत असल्याने एका रक्तदात्याचा अनेकांना फायदा होत असल्याने या पुण्यकार्यात सहभागी व्हावे. अल-करम हाॅस्पीटलच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त अल-करम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या अलकरम हाॅस्पीटलच्यावतीने रामचंद्रखुंट येथे महेश मंगल कार्यालय व अहमदनगर किल्ला मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होेते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.संग्राम जगताप, तांबोली हज टुर्स अॅड ट्रावेल्सचे संचालक हाजी शौकत भाई तांबोली, मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शाह निज़ाम, नगरसेवक समद खान, सचिन जाधव,डॉ जहीर मुजावर,फैसल सैय्यद, नावेद सिमला,आमीर सैय्यद, किंग बेकरीचे मन्सुर भाई, अफ़ज़ल पैलवान, उबेद शेख,वहाब भाई पत्रकार, चांद सुलताना हायस्कुल चे प्राचार्य समी आदि मान्यवर उपस्थित होते. 
प्रास्ताविक करतांना अरशद सैय्यद म्हणाले,आज प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे झाले आहे, त्यामुळे रस्ते अपघाता बरोबरच इतरही अनेक कारणांनी रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. अशा परिस्थिती प्रत्येकाने कर्तव्य म्हणून  वर्षभरातून एकदातरी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून रक्तदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले. 
रक्तसंकलनचे कार्य सिव्हिल हाॅस्पिटल ब्लॅड बँक, अर्पण ब्लॅड बँक, बाळासाहेब देशपांडे ब्लॅड बँक यांनी केले. या शिबीरात 150 रक्त पिशव्यांची रक्तसंकलन करण्यात आले. मागील अनेक वर्षा पासुन सलग रक्तदान शिबीर घेणयाचे या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. 
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शेर अली शेख व समीर सैय्यद यांनी केले.तर आभार सैफुद्दीन शेख यांन मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी इमरान भाईजान,शाहीद काझी, आसिफ तांबोली गड्डया, शोएब शेख, शाहनवाज तांबोली, तौफीक तांबोली,सैफुद्दीन शेख,शेर अली,समीर सय्यद व अलकरम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा