आधोगती व त्याला कारणीभूत असणारी
मुस्लिम समाजाची बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून बिहार येथील वली रहेमानी -३० या संस्थेच्या वतीने मुस्लिम समाजासाठी सुरु केलेल्या आयआयटी, जेईई व मेडिकलची एआयपीएमटी,नीट परिक्षेसाठी १० वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परिक्षा झाली. संपूर्ण राज्यातून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या परिक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रहमानी ३० संस्थेतर्फे ११ वी व १२ वी
मुस्लिम समाजाच्या आयआयटी व मेडिकल मधील टक्का वाढावा, विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षे बद्दलचे अज्ञान दूर करून त्यांना मार्गदर्शन करून या परीक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वली रहमानी 30 यांनी केले होते. ही परीक्षा ए टी यु चांद सुलताना हायस्कूलच्या सहकार्याने संपन्न झाली.या परिक्षेत 56 विधार्थांनी भाग घेतला.
यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल मतीन, सैय्यद असगर आदि पदाधिकारी,परिक्षेसाठी केंद्रप्रमुख तांबोली मोहम्मद युसूफ,परिक्षा समन्वयक शेख अकिल अहमद,मुख्याध्यापक शेख समी इमाम, उपमुख्याध्यापक तांबोली शफी खुदाबक्ष यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
मुस्लिम समाजाचा आयआयटी व मेडिकल मधील टक्का वाढावा, विद्यार्थ्यांमध्ये या परिक्षेबद्दलचे अज्ञान दूर करुन त्यांना मार्गदर्शन करुन या परिक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी संस्थेचे पदाधिकार्यांनी केले.
अशा परिक्षा व इतरही स्पर्धात्मक परिक्षा भविष्यात ए टी यु चांद सुलताना हायस्कुल येथे आयोजित कराव्यात व शिक्षणात मागासलेल्या अल्पसंख्याक समाजास पुढे नेण्यास मदत करावी, असे पालक वर्गांनी नमूद केले व या उपक्रमाबद्दल सर्व पदाधिकारी व शिक्षकांचे कौतुक केले.
Post a Comment