हजरत हाजी गुलामरसुल भिकन शाह उर्दू हायस्कूल श्रीरामपूर येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ

आज दि.२५/०२/२०२३ रोजी हजरत हाजी गुलामरसुल भिकन शाह उर्दू हायस्कूल श्रीरामपूर येथे इयत्ता १० वी. सन २०२२/२३ या बॅच चे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोशिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचं विद्यार्थीनी कु.कशफ सादिक शाह व कु.हुमेरा जाकिर शाह यांनी केले. कार्यक्रमाचं अध्यक्ष सुचना काकर अल्ताफ सर यांनी मांडले व अनुमोदन शाह साबिर सर यांनी दिला
 अध्यक्षस्थान शाळेचं विश्वस्त सचिव *श्री. हाजी अल्ताफ शाह सर* होते 
       कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कलामे पाक ने झाली कार्यक्रमात प्राथमिक शाळेचं चिमुकल्या मुलींचं फैंसि ड्रेस कॉमपिटिशन ठेवण्यात आले होते व मुलांचे विविध प्रोग्राम घेण्यात आले व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत यश संपादन केल्या बद्दल राईटींग पॅड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच दहावीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यात आले 
       कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. हाजी जाकिरहुसेन शाह सर (मुख्याध्यापक जि.प.राहता)श्री. मुख्तार भाई मणियार (समाज सेवक),राजु भाई इनामदार सर (शिक्षक नेते), बाळासाहेब पाटोळे सर (गुरू माऊली मंडळ तालुका अध्यक्ष),हाजी मुख्तार भाई शाह (माजी नगरसेवक श्रीरामपूर नगर पालिका), श्री. बुरहान मामु (सामाजिक कार्यकर्ते), श्री. सुजित बनकर सर (शिक्षक परिषद तालुका अध्यक्ष), श्री.कलीम भाई कुरेशी (माजी नगरसेवक श्रीरामपूर न.पा.) श्री. फेरोज भाई शाह,( समाज सेवक) श्री.अजहर भाई शेख (युवा नेते), श्री. इस्माईल मामु काकर, आसिफ भाई काकर, अकबर भाई शाह व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकांचं व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आभार शेख अजिज सर यांनी मानले.
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा जैद सर, शेख शहेनाज मॅडम, काकर अल्ताफ सर, शाह साबिर सर, शेख अजिज सर, शाह रज्जाक सर, शाह अक्रम सर व प्राथमिक चे सय्यद शिरीन मॅडम, चाऊस मरीयम मॅडम यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा