जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी पुस्तकं प्रकाशन, काव्य संमेलन व नारी गौरव सन्मान सोहळा

अहमदनगर – *शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  महिलांचे भावविश्व उलगडविणाऱ्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह "ती" च्या कविता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, काव्यसंमेलन व नारी गौरव सन्मान सोहळा रविवार दि ५ मार्च २०२३ रोजी सकाळी १०- ३० वा आयोजित करण्यात आला आहे”,अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी दिली.*
           वॉरियर्स एज्युकेशन सेंटर अँड प्री प्रायमरी स्कूल,कॉटेज कॉर्नर, सावेडी येथे पुस्तक प्रकाशन,काव्यसंमेलन व नारी गौरव सोहळा होत आहे.यावेळी कोपरगाव च्या माजी नगराध्यक्ष सौ.ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित,सौ.किरण बारस्कर, प्राचार्य स्वाती दराडे इ मान्यवर उपस्थित राहणार असुन यावेळी उपवन संरक्षक सुवर्णा माने, प्रा.डॉ.मीना साळे, वळण च्या उपसरपंच लीलाबाई गोसावी,डॉ.संगीता कांडेकर,डॉ. चेतना बहुरूपी यांना नारी गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्ताने परिसरातील काही कर्तबगार महिलांचाही वॉरियर्स फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
         तरी या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजिका शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य संघटक शर्मिला गोसावी,राज्य कार्यकारणीच्या सदस्या स्वाती ठुबे,जयश्री झरेकर, वंदना चिकटे, विद्या भडके,संगीता दारकुंडे, मनीषा गायकवाड, वोरीअर्स च्या आरती व संगीता गिरी,अनिता कानडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा