पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सर्वांना सहभागी करून घेणार : राजेंद्र उदागे




▪️ मखदुम समाचार ▪️
अहमदनगर (प्रतिनिधी) १७.३.२०२३
भर घालणाऱ्या शब्दगंध च्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन लवकरच करण्यात येणार असून या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिकांसह अहमदनगर जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना सहभागी करून घेण्यात येईल,त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
      शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक सचिव सुनील गोसावी, माजी अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले,भगवान राऊत यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
      सदर सर्वसाधारण सभेत  पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करणे,संमेलनाच्या अनुषंगाने विविध समित्या स्थापन करणे, जबाबदारीचे वाटप करणे,निधी संकलन, विविध पुरस्कार,पुस्तक परीक्षण समिती याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, नवीन काव्यसंग्रह येत असल्याबद्दल कवी चंद्रकांत पालवे, बाळासाहेब अमृते,ल.की. दिवटे यांचे तर सुभाष सोनवणे, सुनील गोसावी,शर्मिला गोसावी, भगवान राऊत, राजेंद्र फंड यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल, प्रकाश खंडागळे यांना  पत्रकारितेतील जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच शब्दगंध सभासदांनी मिळविलेल्या विशेष यशाबद्दल, पुरस्कार बद्दल अभिनंदन करण्यात आले. संमेलन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शब्दगंधच्या परंपरेनुसार सर्व सभासदांच्या मतांचा, सूचनांचा विचार या सभेत करण्यात आला. संमेलनासाठी लागणारा निधी प्रथमत: पदाधिकारी व सभासदांनी स्वतः द्यावा व त्यानंतर निधी साठी इतरांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा समन्वयक प्रभाकर सूर्यवंशी, बीड जिल्हा समन्वयक शिराज शेख, नाशिक जिल्हा समन्वयक सरोज आल्हाट, पुणे जिल्हा समन्वयक श्रीनिवास गोरे, औरंगाबाद जिल्हा समन्वयक डॉ.शेषराव पठाडे, कोपरगाव शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे,शेवगाव चे अध्यक्ष हरिभाऊ नजन,पाथर्डी चे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे, श्रीरामपूर चे अध्यक्ष लेविन भोसले, राहाता चे हिराचंद ब्राह्मणे,आष्टी चे बाळासाहेब शेंदुरकर, पारनेर चे ओमप्रकाश देंडगे,राहुरी शाखेचे बाळासाहेब मुंतोडे,शब्दगंध चे कार्यवाह डॉ.अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, शाहीर भारत गाडेकर, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर ,सुनीलकुमार धस, राजेंद्र फंड, शर्मिला गोसावी, रामकिसन माने, बबनराव गिरी,स्वाती ठूबे, राजेंद्र पवार, ज्ञानदेव पांडूळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे, प्रमोद येवले,ऋता ठाकूर, प्रा. मेधाताई काळे, डॉ.अनिल गर्जे,कवी चंद्रकांत पालवे, कॉ. बाबा आरगडे, दशरथ खोसे,यांनी यावेळी चर्चेत सहभागी होऊन निर्णय घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा