कान्हेगाव जि.प.शाळेत वार्षिकस्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

श्रीरामपूर -(शौकतभाई शेख)तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक रणजित दादा बनकर,जितेंद्र तोरणे, माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, पढेगाव चे सरपंच किशोर नाना बनकर, अविनाश काळे उपस्थित होते. श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांनी अत्यंत सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याबद्दल शाळेतील दोन्ही शिक्षिकांचे कौतुक केले. नव्या - जुन्या गाण्यांचा अनोखा संगम बहारदार नृत्य उत्तम अभिनय  फटाक्यांची आतिषबाजी व मुलांच्या जल्लोषाने सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमादरम्यान केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत  यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्राचे पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच बालआनंद बाजारच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पिता पालक मनोरंजन स्पर्धेचे बक्षिस वितरण देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलनानिमित्ताने नेताजी फाऊंडेशन पढेगांव यांच्याकडून शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद खरात यांनी अध्यक्षीय सूचना मांडली अनुमोदन बाळासाहेब खरात यांनी दिले प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अरुण खरात यांनी केले .संपूर्ण  कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती रेहाना मुजावर शेख यांनी केले .कार्यक्रमासाठी तालुक्यातून अनेक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी तसेच पढेगाव पंचक्रोशितील अनेक ग्रामस्थ व कान्हेगावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदेश देणारे नृत्य सैनिक गीत शिवाजी महाराजांचे संदेश देणारे गीत अशा अनेक नृत्यावर गीत  सादर करून मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती रेहाना मुजावर शेख, मुख्याध्यापिका श्रीमती  वैशाली थोरात,शाकीर शेख  तसेच गावातील पालक शाळा व्यवस्थापन समिती व तरुण मंडळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा