शाहशरीफनगर नावाचा ठराव करावा; एम.आय.एम.ची महापौर व आयुक्तांकडे मागणी

▪️ मखदुम समाचार ▪️
अहमदनगर (प्रतिनिधी) १७.३.२०२३
अहमदनगर - अहमदनगरचे नाव शहाशरीफनगर करावे अशी मागणी एम आय एम ने  महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त डॉ पंकज जावळे यांना निवेदन द्वारे केली.
मनपाच्या येत्या सभेमध्ये अहमदनगर चे नाव शहाशरीफनगर देण्याचा ठराव अजेंड्यावर घेऊन मंजूर करण्याची मागणी केली.
एम आय एम तर्फे निवेदनात म्हणले आहे की आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना व त्यांच्या पुर्वजांना मानणाऱ्या प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मुळ शिवसेना पक्षाच्या लोकप्रिय प्रतिनिधी तसेच आमच्या लोकप्रतिनिधी असून अहमदनगरकरांच्या भावना समजून घेऊन त्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करत आहोत.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व एम.आय.एम. पक्षाच्यावतीने अहमदनगरचे नाव बदलण्याबाबतचे राजकारण सध्या सुरू आहे.या विषयाबाबत अहमदनगरकर जनतेची एकजूट न बिघडता शहराचे नाव शहाशरीफनगर असावे अशी आमची स्पष्ट भुमिका आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्यावतीने आपणास विनंती करत आहोत की, अहमदनगर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऋणानुबंध अत्यंत जुना आहे. त्यांचे पूर्वज मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, शरीफजी राजे भोसले या सर्वजणांची कारकिर्द याच शहरात बहरली. त्यांनी येथे अनेक पराक्रम केले.
इसवीसन १६२४ सालची भातोडीची लढाई जगप्रसिध्द आहे. शहराजवळील भातोडी पारगाव येथे हि लढाई झालेली होती. या लढाईमधे शिवरायांचे वडिल शहाजीराजे यांनी फार मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांनी गनिमी कावा वापरून भोतोडीचा तलाव फोडला व शत्रूसैन्याला हरवले होते. या लढाई नंतर शहाजीराजेंना 'सरलष्कर' हा किताब दिला गेला होता. याच लढाईत त्यांचे बंधु व शिवरायांचे चुलते शरीफजीराजे हे शहीद झाले. त्यांची समाधी आजही भातोडी या गावी आहे. शिवरायांच्या पुर्वजांचा पराक्रम आपण सर्वांनी ध्यानात ठेवला पाहिजे. त्याला सलाम केला पाहिजे.
शिवरायांचे पुर्वज शहाजीराजे व शरीफजी राजे यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे. त्यांचे नाव सुर्यचंद्र असेपर्यंत रहावे यासाठी आपण मनपाच्या येत्या सभेमधे 'शहाशरीफनगर' नाव देण्याबाबतचा ठराव अजेंड्यावर घेऊन तो सर्वानुमते मंजूर करावा. शिवरायांच्य पुर्वजांचे आपण ऋणी रहावे म्हणून सर्व नगरसेवक हा ठराव बिनविरोध मंजूर करतील कोणीच विरोध करणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे आणि चुलते शरीफजीराजे यांच्या नावावरून 'शाहशरिफनगर' असे देण्याचा ठराव एकमताने मंजूर करावा. अशी आम्ही विनंती करत आहोत. हा विषय तात्काळ मनपाच्या येत्या सभेमधे अजेंड्यावर घ्यावा.
छत्रपती शहाजीराजे भोसले यांची जयंती दि. १८ मार्च २०२३ रोजी असल्याने आपण जयंतीच्या दिवशी या ठराव मंजूरीचा संकल्प करून शिवरायांच्या पुर्वजांच्या पराक्रमाला उजाळा द्यावा. तसेच शिवप्रेमी जनतेला शाहशरिफनगर या नावाची भेट द्यावी.
लवकरच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व एम आय एम पदाधिकारी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे यांना भेटून शाहशरीफनगर या नावाला समर्थनाची मागणी करणार आहोत
यावेळी एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, कार्याध्यक्ष मतीन शेख, शहर विद्यार्थी अध्यक्ष सनाउल्ल्हा तांबटकर, इमरान शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा