अहमदनगर/प्रतिनिधी ः नगरमध्ये मागील सात महिन्यांपासून चर्चेतअसलेल्या लष्कराच्या बनावट एनओसी प्रकरणात योग्य तपास झाला नसल्याचा दावातक्रारदार व येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला असून, याबाबत मुंबईउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली आहे व याबाबत म्हणणे मांडण्याच्या नोटीसा नगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला,तपास अधिकारी नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे व कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना बजावण्यात आल्या आहेत. येत्या 12 एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे.
नगर शहर व तालुक्यातील लष्कराच्या हद्दीलगतच्या मालमत्ता वप्लॉटवर बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वार्टरकडून ना-हरकतदाखला दिला जातो. मात्र, उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यां पैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. बबन भागचंद बेरड (रा. भिंगारता.नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंद नगर), निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर 5 जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात 28 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्तेशाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखलकेली आहे. त्यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्यासमोर सुनावणी होऊन,कोतवाली पोलिस ठाण्यात यासंदर्भात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शेख यांचा जबाबनोंदवून घ्यावा तसेच तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवरदाखल करून घ्यावीत,असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिलकातकडे यांना दिले होते. त्यानुसार तपासी अधिकारी कातकाडे यांनी शेखयांचा जबाब घेतला व त्यांच्याकडून काही कागदपत्रेही घेतली. पण पुढे सखोल तपासन करता थेट न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे आता शेख यांनी आणखी एकयाचिका दाखल केली असून, संबंधित प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने याबनावट एनओसी प्रकरणाचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. या याचिकेची नुकतीच 14 मार्चला न्यायमूर्ती मंगेशपाटील व एम. एम. साठ्ये यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शेख यांच्यावतीनेअॅड. प्रज्ञा तळेकर व अॅड. अजिंक्य काळे यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. एस.जे. सलगरे यांनी युक्तिवाद केला.
--------------------------------------------------------
तपासातील त्रुटी दाखवल्या
--------------------------------------------------------
या याचिकेच्या सुनावणीत तपासात झालेल्या त्रुटीयाचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या प्रकरणी केवळ तीन गुन्हेदाखल आहेत. शेख यांच्या जबाबानंतर पोलिसांनी या तपासाची व्याप्ती वाढवून याप्रकरणाशी संबंंधित आणखी कोण-कोण आहेत, यांचा शोध घेणे गरजेचे होते. तसेचअन्य काही अशी फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत काय, याचाही शोध घेऊनत्यासंदर्भातही गुन्हे दाखल करणे आवश्यक होते.पण पोलिसांनी फक्त तीन दाखलगुन्ह्यांपुरता तपास सीमित ठेवून या प्रकरणांचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केलेअसल्याने या प्रकरणातील अन्य गुन्हेगारांना अभय दिल्या सारखे झाले आहे, असा दावा शेखयांच्यावतीने काम पाहणारे अॅड. तळेकर व अॅड. काळे यांनी केला. यावरन्यायालयाने याची दखल घेऊन तपासातील त्रुटी व अन्य मुद्यांच्या अनुषंगाने म्हणणेमांडण्याच्या नोटीसा नगर जिल्हा पोलिस अधीक्षक, तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी व कोतवाली पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक यांना बजावण्याचेआदेश दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.
--------------------------------------------------------
आयजींकडून स्वतंत्र चौकशी सुरू
--------------------------------------------------------
बनावट एनओसी प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यातआल्यावर लष्करी आस्थापना व महसूल विभागाने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणीभिंगार कॅम्प पोलिस ठाण्याकडे केली होती. पण या पोलिस ठाण्याचेप्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. देशमुख यांनी चौकशी सुरू असल्याचेकारण सांगून पाच महिने त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याने सामाजिक कार्यकर्तेशाकीर शेख यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटीलयांच्याकडे तक्रार केली होती. त्याची त्यांनी तातडीने दखल घेऊन पोलिस अधीक्षकांकडून यासंदर्भातील सविस्तर अहवाल मागवला तसेच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिले आहेत व त्यांनी याचौकशी अंतर्गत तक्रारदार शेख यांचा जबाब नुकताच नोंदवला आहे.
إرسال تعليق