अहमदनगर- *एक महिला शिकली तर ती दोन्ही कुटुंब सक्षम करू शकते त्यासाठी आपल्या मुला मुलींना शिकून सक्षम करायला हवे* असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य संघटक कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, लाल बावटा बिडी कामगार युनियन शहर शाखेच्या वतीने श्रमिकनगर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ. शोभा पासकंट्री या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड सुधीर टोकेकर, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, सोनाली दुल्लम, संगीता कोंडा,भाग्यलक्ष्मी गड्डम, रेणुका अंकाराम, लक्ष्मीबाई कोटा, शारदा बोगा, कमलाबाई दोदा,निर्मला न्यायपेल्ली, सुनंदा पेद्राम इ मान्यवर उपस्थित होते.
शर्मिला गोसावी म्हणाल्या की, आपले दररोजचे कामकाज सांभाळून स्वतःसाठी,स्वतःचे छंद जोपासण्यासाठी काही वेळ काढायला हवा, आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक सक्षमीकरणाची आवश्यकता असून महिलांनी त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.
ॲड सुधीर टोकेकर यांनी शर्मिला गोसावी यांचा परिचय करून दिला. कॉ.भारती न्यायपेल्ली यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन सूत्रसंचलन केले. शेवटी सगुणा श्रीमल यांनी आभार मानले.
सुनील गोसावी यांनी बचत गटांचे महत्व समजावून सांगितले. यावेळी महिलांना भेट वस्तूंचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.
Post a Comment