◽ मख़दुम समाचार◽
नेवासा (कार्तिक पासलकर) २७.४.२०२३
येथील तहसिलदारांचे मुख्य कार्यालय असलेल्या नविन बांधण्यात आलेल्या इमारतीला ७/१२ नसल्याने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र दिनी सोमवार दि. १ मे २०२३ रोजी होऊ घातलेले उदघाटन रखडणार की काय अशी चर्चा सुरू आहे. नेवासा तहसिलदारांचे कार्यालय जुने झाल्याने त्याच्याच मागे नविन कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. या इमारतीस लाखो रूपये खर्च केला गेला. सर्व तयारी करून येत्या १ मे रोजी उघघाटनाचा घाट घालण्यात आला होता परंतु आयत्यावेळी लक्षात आले की नविन बांधलेल्या इमारतीस ७/१२ च नाही. त्या जागेची सरकार दरबारी कोणताच सर्व्हे नंबर म्हणून नोंद नाही. मग विनासातबारा बांधलेल्या इमारतीचे शासकीय उदघाटन कसे करायचे?
तहसिलदारांसाठी बांधुन तयार असलेल्या कार्यालय इमारतीचे उदघाटन करण्यापुर्वी ७/१२ तयार करण्याची धावपळ सुरू झाली. ७/१२ शोधला पण तोच नसल्याने सिटीसर्व्हेचा उतारा मिळण्याची धडपड सुरू झाली. शेवटी याचे हा प्रशासकीय अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना आहे. त्यांनी नविन सिटीसर्व्हे नंबरच्या प्रकरणास मंजूरी दिली तरच पुढे काम होणार आहे.
हा भाग महसूल विभागाकडून सिटीसर्व्हेकडे वर्ग होत असताना प्रशासकीय चुकीमुळे ७/१२ च गायब झाला. हे स्थित्यांतर होताना ७/१२ चा सिटीसर्व्हे उताराच तयार केला गेल नाही म्हणून कागदोपत्री क्षेत्र गायब झाले. या क्षेत्राला कोणताच सर्व्हे नंबर नाही तरीही त्यावर लाखो रूपये खर्चून कार्यालयाची नविन इमारत बांधुन १ मे रोजी महाराष्ट्रदिनी उदघाटनासाठी तयार आहे. मग या गायब झालेल्या ७/१२ मिळविण्यासाठी सिटीसर्व्हेची कारवाई सुरू झाली, तहसिलदारांनी पुढाकार घेतलेला आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाला चारच दिवस शिल्लक राहिल्याने नेवासा तहसिलदारांच्या नविन बांधुन तयार असलेल्या विनासातबाराच्या इमारतीचे उदघाटन होणार की नविन सिटीसर्व्हे उतारा तयार करून उदघाटन केले जाणार ? हा प्रश्न आहे.
إرسال تعليق