▫️ मख़दुम समाचार ▫️
अहमदनगर (लहू दळवी) २८.४.२०२३
शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे झपाट्याने उपनगरे निर्माण होत आहे. याठिकाणी नागरी वसाहती वाढत आहे. त्यामुळे व्यापारीकरण वाढत चालले आहे. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असते. सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशने एकत्र येऊन व्यवसायिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन असोसिएशनच्या माध्यमातून काम केल्यास प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत असते. तसेच व्यावसायिकरणालाही चालना मिळते. शहराच्या सर्वच उपनगरामध्ये बाजारपेठा निर्माण होत आहे सावेडी उपनगर परिसरामध्ये रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. गुलमोहर रस्ता, पाईपलाईन, तपोवन, कृष्ठधाम, भिस्तबाग चौक ते महालापर्यंत रस्त्याची कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे व्यवसाय करणही वाढले आहे. सावेडी उपनगरचे व्यापारी असोसिएशनचे सर्वांना बरोबर घेऊन सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पै. शिवाजी चव्हाण, मनपा सभागृह नेते विनीत पाअुलबुद्धे, नगरसेवक महेंद्र गंधे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, शशिकांत नजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पीएसआय समाधान सोळंके सहाय्यक, पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, जुबेर मुजावर, असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष भोजने, सचिव प्रमोद डोळसे, सहसचिव श्रीपाल कटारिया, खजिनदार केतन बाफना, यश शहा, मंगेश निसळ, शिवाजी मुंगसे, सचिन बाफना, विपुल छाजेड, प्रसाद कुलकर्णी, लक्ष्मीकांत चिकटे, रोहित पवार, आशिष कासार, विकास वामन आदी उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष पै. शिवाजी चव्हाण म्हणाले की, सावेडी उपनगर हे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे या परिसरातील नागरिकांना उपनगरामध्येच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही ऑनलाइन शॉपिंगच्या नादी न लागता आपल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी जेणेकरून आपल्या शहराला फायदा होईल असोसिएशनच्या माध्यमातून सभासदांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जात आहे. सर्वांनी एकत्रित येऊन सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे चांगले काम उभे करू असे ते म्हणाले.
पवननगर येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती केंद्रामध्ये चांगले खेळाडू निर्माण होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे दहा लाख रुपये किमतीची खेळाडूंना सराव करण्यासाठी मॅट उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून भविष्य काळामध्ये अहमदनगर शहरातील कुस्तीपटू 'महाराष्ट्र केसरी'चा बहुमान नक्कीच मिळेल असे ते म्हणाले.
◾
🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज
إرسال تعليق