शरदचंद्रजी पवार होमीओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये डॉ सॅम्युअल हैनीमन जयंती व जागतीक होमिओपॅथीक दिन साजरा

श्रीरामपुर - दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा ट्रस्ट संचालित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल श्रीरामपूर, राष्ट्रीय सेवा योजना, आयुष संचानालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नासिक व राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग नई दिल्ली अंतर्गत जागतिक होमिओपॅथिक दिन व २६८ वी डॉ सॅम्युअल हैनीमन यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या
आयोजनात सकाळी १०.०० वाजता प्रश्न मंजुसा स्पर्धा घेण्यात आली त्यात कुमार मोहिते शुभम याने पहिला क्रमांक मिळावला, या स्पर्धेत महाविद्यालयातील प्रथम वर्ष दृतीय वर्ष तृतीय वर्ष चतुर्थ बी एच एम एस च्या सर्व विदयार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. तदनंतर १०.०० वाजता महाविद्यालयात जागतिक होमिओपॅथीक दिन व समुअल हैनीमन जयंती चा कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते. यात कॉलेज मधील सर्व विदयार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ रिझवान अहमेद यांनी स्वीकारले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ प्राची आंबेकर यांनी कार्यक्रमाची प्रास्तवाना व होमिओपॅथी या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात होमिओपॅथी या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १५ विदयार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व सर्वांनी अतिशय उत्कृष्ट भाषण सादर केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमार पाटील तुषार
प्रथम वर्ष दृतीय क्रमांक कुमारी कविता अधागळे व तृतीय क्रमांक कुमारी निकिता पवार यांनी पटकावले.वरील विदयार्थ्यांना महाविद्यालया कडून पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ देशमुख शाकिर यांनी विद्यार्थ्यांना होमिओपॅथीचे महत्व व औषधे यांची माहिती दिली.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ अभय पानसंबळ यांनी केले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. रिझवान अहमेद, प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, डॉ.
सौदागर शकील,डॉ. बापूसाहेब हरिश्चंद्रे, डॉ.डे रोनिता, डॉ. जेथलिया विपीन, डॉ. खोबरेकर स्वाती,डॉ. कळमकर पोर्णिमा, डॉ. पानसंबळ अभय, डॉ. साबळे दर्शनी, डॉ. जैस्वाल आशिष, डॉ. देशमुख शाकीर, डॉ. दहे विद्या, डॉ. जाधव भगीरथ, डॉ. पटेल रियाझ, डॉ. आगळे अनिता, डॉ. पवार विजय,डॉ. मेहेर पियुष, डॉ. रेखा नाईक, डॉ. खांडेकर सारिका, डॉ. आंबेकर प्राची, डॉ. सोनी गौड,डॉ. अचलिया पियुष, डॉ. मुनाझ्झा शेख, डॉ. सोनावणे प्रतिमा, डॉ. पठाण महेजबिन, डॉ. केदार शुभांगी,डॉ. थोरात सुरज, डॉ. कळमकर प्रदीप, डॉ. रणसिंग समर, डॉ. टेंभूर्णे विशाखा शिक्षिकेतर व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्यांनी सर्व विजेत्या विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अभय पानसंबळ यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा