परिवर्तनवादी चळवळीला पाठबळ मिळणे आवश्यक : शर्मिला गोसावी

*शेवगाव* - *आचार,विचार, कृती,क्रांती आणि परिवर्तन या पंचतत्त्वावर परिवर्तनाची दिशा अवलंबून असून मनात विचार आला की,आचरणातून कृती घडते,कृती झाली की क्रांती होते,क्रांती झाली की परिवर्तन होत असते,बहुजन समाजासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी परिवर्तनवादी चळवळीला अधिक पाठबळ मिळाले पाहिजे,* असे प्रतिपादन  प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य सहसचिव कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.
         शेवगाव येथील पंचायत समिती सभागृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती,शब्दगंध साहित्यिक परिषद,भारतीय बौद्ध महासभा आणि बोधिसत्व युवक संघटना याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिवर्तनवादी काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.यावेळी विचारपिठावर जि.प.चे माजी सदस्य पवनकुमार साळवे,प्रा. चंद्रकांत कर्डक,प्रा.डॉ.शंकर चव्हाण,प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे,डॉ.कैलास दौंड,सुभाष सोनवणे,कॉ.भगवानराव गायकवाड,राजेंद्र फंड,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, हरिभाऊ नजन उपस्थित होते.
      पुढे बोलताना शर्मिला गोसावी म्हणाल्या की, "शेवगाव येथे गेले अनेक वर्षेपासून आंबेडकर जयंती निमित्त सुरू झालेले काव्य संमेलन बंद पडले होते,ते आता सुरू झाल्याने साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,ते सातत्याने टिकले पाहिजे,यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे,शेवगाव ही परिवर्तनाची आणि साहित्यिक कलावंत यांना बळ देणारी भूमी आहे."
      यावेळी कॉ.भगवानराव गायकवाड म्हणाले की, महामानवाचे विचार समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणारे असतात ते आत्मसात करणे गरजेचे आहे. 
"वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष सुरू असताना साहित्यिकांनी भूमिका घेऊन लेखन करणे आवश्यक आहे," असे मत शेवगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी व्यक्त केले. यावेळी झालेल्या काव्य संमेलनामध्ये डॉ.कैलास दौंड, राजेंद्र फंड,सुभाष सोनवणे, रज्जाक शेख,ऋता ठाकूर, आनंदा साळवे,विनायक पवळे, राजेंद्र उदारे,हुमायून अत्तार,अर्जुन देशमुख,प्रशांत सूर्यवंशी,विद्या भडके,संगीता दारकुंडे,विठ्ठल सोनवणे,उमेश घेवरीकर, बाळासाहेब कोठुळे,आत्माराम शेवाळे,वैभव रोडी,शालन देशमुख,वसंत बडे,गवाजी बळीद,पांडुरंग वाव्हळ,बबनराव गिरी,गोरख पवार,पुनम राऊत, नितीन गायके,अश्विनी गोरखे, कॉ.आत्माराम देवडे,गौतम वाघमारे आणि चंद्रकांत कर्डक यांनी आपल्या रचना सादर केल्या.
     प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कवी संदीप काळे यांनी सूत्रसंचालन केले.स्वागत विजय हूसळे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी शब्दगंध चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ नजन यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल इंगळे, कैलास तिजोरे, विलास खंडागळे,सुखदेव सोनवणे,संजय गंगावणे, बाळासाहेब घाटविसावे, प्रदीप पटवेकर, संतोष पटवेकर,जीवन अंगरख, विजय मगर, आतिश सोनवणे, सचिन दळवी, बाळासाहेब भोसले, सुरेश शेरे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित कवी व मान्यवरांना 'आठवणींचा डोह ',बाळ अमृत, 'तिच्या कविता' हि पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा