▪️ मखदुम समाचार ▪️
अहमदनगर (प्रतिनिधी) . २०.४.२०२३
जागतिक आराेग्य दिनानिमित्ताने अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील बडे हाॅस्पिटलमध्ये महिलांची माेफत आराेग्य तपासणी शिबीर झाले. या शिबिरात सहभागी झालेल्या ९० महिलांची तपासणी करून त्यांना माेफत औषधोपचार करण्यात आले. बडे हाॅस्पिटलचे संचालक स्त्री राेगतज्ज्ञ डाॅ. गणेश बडे आणि डाॅ. छाया बडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या महिलांची आराेग्य तपासणी केली. डाॅ. बडे दाम्पत्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात भगवान धन्वंतरी पूजन झाले. शिबिरात सहभागी झालेल्या महिलांशी डाॅ. बडे दाम्पत्यांनी संवाद साधला. महिलांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची डाॅ. बडे दाम्पत्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
डाॅ. गणेश बडे म्हणाले, "महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची, त्यातही शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांतील कामगार महिलांची आरोग्याची स्थिती बिकट आहे. शेती, शेतमजुरी, ऊसतोड, बांधकाम, घरकामगार, कचरावेचक, वीटभट्टी, मासेमारी, पथारी व भाजी विक्रेत्या अशा अनेक क्षेत्रांत महिला काम करतात. कामगार महिलांच्या आरोग्यावर गरिबी, बेरोजगारीची टांगती तलवार, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, हिंसा, वंचितता, कुपोषण, ॲनिमिया, बालविवाह, दुष्काळ, बेभरवशाची शेती या सगळ्याचा परिणाम होतो". स्त्री कामगारांना योग्य वेळी उपचार उपलब्ध न मिळाल्यास आराेग्याचे अनेक प्रश्न निर्माण हाेतात. त्याची तीव्रता अधिक गंभीर असते. यातून हे शिबिर आयाेजित करण्या आले. शिबिरात तपासणीबराेबच औषधोपचार देखील माेफत करण्यात आल्याचे डाॅ. गणेश बडे म्हणाले. डाॅ. छाया बडे यांनी १६ ते १८ वर्षे वयोगटातील लैंगिक संबंध व गर्भधारणा लक्षात घेऊन कायद्यामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. किशोरवयीन मुला-मुलींना सर्वसमावेशक लैंगिकता शिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे. तसेच पुरेसा पोषक आहार, किमान उच्च माध्यमिक शिक्षण, पूरक संवेदनशील आरोग्यसेवा, जोडीदार आणि लैंगिकता निवड, विकासाची संधी आणि भेदभाव, हिंसा व बालमजुरी मुक्त जीवन हे किशोरवयीन मुलींचे हक्क अबाधित राखल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे सांगितले.
बडे हाॅस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रामदास शेवाळे, निकीता येपलपेल्ली, सुषमा मकासरे उषा पाटाेळे, रिना चव्हाण, विवेक पटेकर, दाद तेलाेरे, सुवर्ण बडे, शकीला शेख, भारती वाकडे, सुप्रिया कर्पे यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Post a Comment