'महाराष्ट्र भूषण' उष्माघात बळींची जबाबदारी फिक्स करून संयोजकांवर गुन्हे दाखल करावेत - भैरवनाथ वाकळे; सकल भारतीय समाजाच्या वतीने भगतसिंहांना अभिवादन करत मेणबत्त्या लावून बळींना वाहिली श्रध्दांजली !


▫️मख़दुम समाचार▫️ 
अहमदनगर (प्रतिनिधी) १९.४.२०२३
    केंद्रातील सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले आरएसएस बीजेपीचे सरकार देशातील जनतेला विविध भागात विभागून त्यांच्यावर राज्य करण्याचे मनसुबे आखत आहे. त्यासाठी त्यांनी जाती, धर्म, भाषा, अन्न, लिंग, प्रांत असे अनेक भेद पाडलेले आहेत. त्यांच्या ऑक्टोपस सारख्या हजार हातांच्या संघटना देशातील माणसांचे भेद करत आहे. आपला भारत विविधतेने नटलेला आहे. अनेक धर्म, पंथ, जाती, यांनी नटलेला, विविधतेत एकता असलेला आपला देश आहे. आपण लहानपणीपासून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. हे शिकलेलो आहोत. हि एकजूट रहावी, देशातल माणूस अखंड रहावा, माणसांचा अखंड भारत असावा यासाठी सकल भारतीय समाज काम करत आहोत. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने अमित शहा यांना खुश करण्यासाठी अवकाळी पावसाच्या गारपीटीच्या काळात भर उन्हात लाखो लोकांना बसवुन ठेवले होते. या राजकीय कार्यक्रमात उष्माघाताने १२ पेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले आहेत. अनेक लोकांवर उपचार सुरू आहेत, हे महाराष्ट्रास भूषणावह नाही. हे धार्मिक राजकीय उष्माघाताचे बळी निषेधार्ह आहेत. या राजकीय धार्मिक बळींना सकल भारतीय समाजाच्या वतीने श्रध्दांजली वहात आहोत त्याचबरोबर 'महाराष्ट्र भूषण' उष्माघात बळींची जबाबदारी फिक्स करून संयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सकल भारतीय समाज तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांनी केली.
     येथील सकल भारतीय समाजाच्या वतीने काल दि. १८ रोजी खारघर 'महाराष्ट्र भूषण' उष्माघात बळींना मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. सर्वप्रथम पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह स्मारकातील भगतसिंह यांच्या पुतळ्यास संध्या मेढे व प्रणिता कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    उपस्थित असलेल्या सकल भारतीय समाज नागरिकांनी सोबत आणलेल्या मेणबत्त्या शहीद भगतसिंह यांच्या चरणी लावून राजकीय धर्मिक बळींना श्रध्दांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    शिक्षक नेते शरद मेढे म्हणाले की, माणसाने स्वतःच्या बुध्दीचा वापर करून आपले जीवन घडवावे म्हणजे त्याचा विकास होईल.
    यावेळी विद्यार्थी कार्यकर्ते रवी साबळे म्हणाले की, मुंबई येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मरण पावलेल्या बांधवांना मी प्रथम आदरांजली वाहतो. हा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम होता येवढं प्रचंड ऊन असताना आणि कोरोना हा भयंकर रोग पसरत असताना सरकार अश्या गर्दीचे कार्यक्रम आयोजित करते हे मोठे दुर्दव आहे. या कार्यक्रमात अनेक बांधव मृत्युमुखी पडले आहेत. तर काही लोकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न आम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून पडत आहे. सरकार एकीकडे गर्दी करू नका अशा गप्पा मारत आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारची गर्दी निर्माण करत आहे म्हणजे लोकांनी नियम पाळायचे आणि सरकारनी ते तोडायचे हा भयंकर प्रकार आपल्या राज्यात सुरु आहे. हे आपले जागरूक नागरिक म्हणून दुर्दैव आहे. मी एक विद्यार्थी या नात्याने सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने  सरकारला विनंती करतो की, या मृत झालेल्या नागरिकांच्या घरच्या लोकांना मदत मिळावी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.
     अहमदनगरचे मुंबईला उपस्थित असलेले श्रीसदस्य दिलीप घुले यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र भूषण श्री आप्पा स्वामी यांचा खारघर येथे नियोजित कार्यक्रम हा सकाळी साडेनऊ ते साडेअकरा असा होता परंतु राजकारण्यांमुळे तो साडेबारा वाजता सुरू झाला आणि एवढ्या भर उन्हामध्ये उष्माघाताचे राजकारण्यांमुळे बळी ठरले. सर्व श्री स्वयंसेवक हे मानवता यासाठी काम करतात त्या कुठल्याही जाती-धर्माचे किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. सर्व मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.
    स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे यशवंत तोडमल म्हणाले की, आत्ताचा काळ कसोटीचा असून आपण सर्वसमाजघटकांनी एकजूटीने वाईट लोकांविरोधात कार्य केले पाहिजे. ज्याच्याकडे जे जे चांगले आहे ते घेतले पाहिजे. सकल भारतीय समाज म्हणून आपण पुढे आले पाहिजे.
    यावेळी आम आदमी पक्षाचे रवि सातपुते म्हणाले, सकल भारतीय समाज तर्फे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. हा कार्यक्रम समजल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला जे येऊ शकले नाहीत त्यांनी  मेणबत्ती देऊन आमच्या तर्फे मेणबत्ती असे म्हणून भारतीय सकल समाजास सहभाग नोंदवला. भारतीय सकल समाज म्हणजेच भारतात राहणारे सर्व नागरिक या ठिकाणी कुठलाही वंश धर्म जात याचा संबंध येत नाही मानवता म्हणून अनेक लोक सहभाग नोंदवण्यास तयार आहेत आपण त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे.
    गौतम कुलकर्णींनी या घटनेचा शेरोशासरी म्हणत निषेध नोंदविला. शेवटी सर्वांनी दोन मिनिटे शांत उभे राहून बळींना श्रद्धांजली वाहिली.
    श्रद्धांजली सभेस सकल भारतीय समाजाच्या वतीने प्रा. बापू चंदनशिवे, आम आदमी पक्षाचे राजेंद्र कर्डिले, गणेश मारवाडे, रहेमत सुलतानचे युनूस तांबटकर, युथ फेडरेशन तथा आदिवासी संघटनेचे चंद्रकांत माळी, धनंजय गोलवड, अनिल भिल, बामसेफचे शिवाजी भोसले, डॉ. भास्कर रणनवरे, रमेश पगारे तुकाराम थोरवे, उर्जिता सोशल फौंडेशनच्या संध्या मेढे, युथ फेडरेशनचे दीपक शिरसाठ, फिरोज शेख, जावेद मास्टर, कामगार संघटना महासंघाचे रावसाहेब कर्पे, वैभव कदम, बाळासाहेब सागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेबुब सय्यद यांनी केले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी श्रीसेवकांकडे व्यवस्थापन असतं तर काहीही अघटित झालं नसतं. शिंदे-फडणवीस सरकारचा खाजगी कंत्राट देण्याचा हव्यास आणि अमित शहांमुळे लादले गेलेले कठोर सुरक्षानिर्बंध दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचं आता श्रीसेवक बोलू लागले आहेत.https://kaydyanewaga.com/silence-started-to-talk-by-violating-order-maharashtra-bhushan-puraskar/#MediaBharatNewsमराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा