▫️मखदुम समाचार▫️
मुंबई (प्रतिनिधी) २०.४.२०२३
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत 'ड' वर्ग महानगरपालिका गटामध्ये अहमदनगर महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. बक्षिसाचा धनादेश व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पाच कोटींचा धनादेश स्वीकारतांना महापौर रोहणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा अनिल बोरूडे, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.
إرسال تعليق