माजी सैनिकांना कला शाखेतील पदवी मिळण्याची संधी

◽ मखदुम समाचार ◽
अहमदनगर, (जिमाका वृत्तसेवा) २०.४.२०२३
     माजी सैनिकांना आंध्र विद्यापीठाकडून कला शाखा पदवी प्राप्त करून घेण्याची संधी आहे. यासाठी माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कार्यालयास संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
    केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात कला शाखेतून BA (HRM) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे हा उद्देश आहे. 

यासाठी माजी सैनिकांने इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व्दारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दिनांक १ जानेवारी २०१० नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवाराना ५ वर्षाचा अभ्यासक्रम (२ वर्ष १२ वी + ३ वर्ष पदवी) लागू राहील. सदर अभ्यासक्रमाचे शुल्क १२५०० रूपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहीतीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट दऊन circulars / publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा