दिनविशेष
▫️ मख़दुम समाचार ▫️
२३.४.२०२३
आज जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. माझा अभ्यासाचा विषय म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांनाही वाचनाची खूप आवड होती. बाल वयातच शाहू महाराजांवर वाचनाचे संस्कार झाले होते. शाहू महाराजांनी अनेक क्षेत्रात जे मूलगामी काम केले, त्यामागे शाहू महाराजांची वाचनाची आवड व विषय समजून घेण्याची तळमळ होती. हे आपल्याला शाहू महाराजांच्या चरित्राचे वाचन केल्यावर समजून येते.
प्रबोधनकार ठाकरेंनी शाहू महाराजांच्या या प्रचंड व्यासंगाविषयी लिहिले आहे, "कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावे शाहू महाराज भडाभड सुचवित होते आणि कशात काय विषय आहे, यावर जिव्हाळ्याचे प्रवचन करीत होते. या क्षणाला प्रथमच महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा मला साक्षात्कार झाला. फार काय पण कित्येक पुस्तकातले काही महत्त्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखविले." या ऐकाच उल्लेखावरुन आपणास शाहू महाराजांचा सखोल व्यासंग समजून येतो. वाचनाशिवाय शाहू महाराजांनी अनेक पत्रकार, लेखकांना भरगोस मदत केली हे तर आपल्याला माहितच आहे. मराठीतील पहिले शिवचरित्र लिहणारे कृष्णाजी केळूसकर गुरुजींनी हे चरित्र शाहू महाराजांनाच अर्पण केले आहे. यातच शाहू महाराजांचे एक वाचक व लेखकांचा आश्रयदाता म्हणून असणारे मोठेपण आधोरेखीत होते.
- डॉ. देविकाराणी पाटील ,
कोल्हापूर, महाराष्ट्र.
(आपल्या जनतेसाठी राजर्षी शाहू महाराजांनी कुराणाचे मराठीमधे भाषांतर करून जनतेमधे वितरीत केले)
Post a Comment