गैबिपीर दर्ग्यासाठी कावड मिरवणूक निघते थेट श्रीराम मंदिरातून; देवगावकरांनी जपली शेकडो वर्षांची एकजूटीची परंपरा !


▫️मख़दुम समाचार▫️ 
नेवासा (कार्तिक पासलकर)  २८.४.२०२३
     तालुक्यातील देवगाव येथील गैबिपीर दर्ग्यासाठी थेट श्रीराम मंदिर येथून कावड मिरवणूक निघत असते. हजरत गैबि साहब वली दर्गाह हे हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतिक आहे. हजरत गैबि साहब वली यांच्या दर्ग्याचा इतिहास अंदाजे १०० पेक्षा जास्त वर्षापासूनचा आहे. अनेक वर्षांपासून हिंदू, मुस्लिम व इतर सर्वच धर्मिय मिळून हजरत गैबि साहब वली यांचा जन्मोत्सव साजरा करतात.
    एकही वर्ष खंड न पडता अनेक वर्षापासून परंपरेने हा जन्मोत्सव साजरा केला जातो. निव्वळ देवगावच नाही तर पंचक्रोशीतील सर्वधर्मीय लोकांची आस्था बाबांवर आहे. एकीकडे राज्यात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असतानासुद्धा देवगाव ग्रामस्थांनी एक आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.
    दरवर्षी प्रमाणे यंदाही हजरत सय्यद गैबिपीर साहब उर्स निमित्त कावड मिरवणूक काढण्यात आली. देवगाव येथून कावड पाणी आणण्यासाठी प्रवरासंगम येथे  युवक जात असतात. ते कावडचे पाणी आणल्यानंतर गावातील श्रीराम मंदिर येथे ठेवले जाते. सायंकाळी मिरवणूक गावातून काढत असताना श्रीराम मंदिर येथून पाणी घेत मिरवणूक सुरुवात करून ढोल ताशांच्या गजरात थेट दर्गा पर्यंत हे पाणी पोहचवले जाते आणि त्यानंतर पुढील विधी केला जातो. विशेष म्हणजे या मिरवणुकीत आणि सर्व विधी पूर्ण होईपर्यंत सर्व जातीधर्मातील लोक यात सहभाग नोंदवितात. हीच परंपरा गेली अनेक वर्षापासून देवगाव ग्रामस्थांनी जपली आहे. सध्याच्या राज्यातील फाटाफुटीच्या राजकारणाच्या वातावरणमुळे ही परंपरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाला पटेल, पै. गुलाब शेख, भरत एडके यांनी मिरवून व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी चोख नियोजन केले. तर इतर सर्व बाबी यात्रा उत्सव कमिटी यांनी सांभाळल्या.
    यावेळी अल्ताफ पटेल, खान सहाब, कचरू गुंदेचा, सिकंदर सय्यद, काय्युम सय्यद, अशोक गुंदेचा, कडू शेख, सागर गुंदेचा, जैद शेख, मकबूल सय्यद, सद्दाम शेख, समीर शेख आदी नागरिक उपस्थित होते. कावड पाणी आणण्यासाठी शहबाज शेख, मंजूर शेख, वसीम शेख, तोफिक शेख, मोईन शेख, शकील शेख, अफरोज शेख, रियाज शेख, निसार शेख, चांद शेख, शर्फुद्दिन शेख, इम्रान शेख, रज्जाक शेख, कदिर शेख, समलान शेख आदी युवकांचा समावेश होता.
    सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ या मिरवणुकीला उपस्थित होते. आज दि. २८ शुक्रवार छबिना मिरवणुकीचा व शोभेच्या दारूचा कार्यक्रम होईल. शनिवार दि.२९ ला कुस्त्यांचा जंगी हमागा होईल, अशी माहिती सत्यमेव जयते प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जैद शेख यानी दिली.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा