अक्षरग्रंथ पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


▫️मख़दुम समाचार▫️
पिंपरी (प्रदीप गांधलीकर) २८.४.२०२३           अक्षरग्रंथ या संस्थेने दि. २२ एप्रिल पासून गोखले हॉल, चिंचवडगाव येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे दहा हजार पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश आहे. यांमध्ये कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, पाकशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारातील मराठी भाषेतील प्रथितयश आणि नवोदित लेखकांच्या नव्या अन् जुन्या पुस्तकांचा समावेश आहे.
    त्यामुळे सर्व वयोगटातील वाचकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून विशेषतः शालेय सुट्टी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी १०:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले असलेल्या या प्रदर्शनाचा ०१ मे हा शेवटचा दिवस आहे, अशी माहिती चित्रसेन गोलतकर यांनी दिली आहे.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा