कविता मानववादी असते - प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस; शब्दधन काव्यमंच काव्य पुरस्कार सोहळा संपन्न


▫️मख़दुम समाचार▫️ 
पिंपरी (प्रदीप गांधलीकर) २४.४.२०२३             कविता मानववादी असते परंतु कवितेला कोणताही धर्म नसतो. भौगोलिकतेच्या सर्व सीमा ओलांडून रसिकांच्या काळजाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य कवितेत असते, असे विचार ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड येथे शुक्रवारी दि. २१ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सबनीस बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री ललिता श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते श्रीकांत चौगुले (शब्दधन काव्यप्रतिभा), हेमंत जोशी आणि सुभाष चटणे (स्वर्गीय अरविंद भुजबळ स्मृती); तसेच ज्योती शिंदे (रोहा,रायगड) स्वप्ना जगदळे (नागपूर) दत्तात्रय खंडाळे (पुणे)  शामला पंडित-दीक्षित, मयूरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर  यांना रमेश पाचंगे यांच्या सुरेल चौघडावादनाच्या पार्श्वभूमीवर शब्दधन छावा काव्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्वागताध्यक्ष नंदकुमार मुरडे, ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ,  डॉ. राजेंद्र कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस आणि ललिता सबनीस या 
साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध दाम्पत्याला विठ्ठल-रखुमाईची उपमा देऊन त्यांचा फुलांचा हार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..." या भक्तिगीताचे गायन केले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शब्दधन काव्यमंचाने तेवीस वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थींच्या वतीने श्रीकांत चौगुले यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले; अन्य कवींनी कवितांचे सादरीकरण केले.
    कार्यक्रमास पुरुषोत्तम सदाफुले, ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, बशीर मुजावर, प्रभाकर वाघोले, बाजीराव सातपुते, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, प्रदीप तळेकर,  रामचंद्र प्रधान, सुहास घुमरे, धनश्री चौगुले, कैलास भैरट, डॉ. क्षितिजा गांधी, सविता इंगळे, नीलेश शेंबेकर, आनंद मुळूक, अनिल नाटेकर, अमिता देशपांडे, शिवाजीराव शिर्के, राजू जाधव, रघुनाथ पाटील यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या संयोजनात एकनाथ उगले, आत्माराम हारे, फुलवती जगताप, शामराव सरकाळे, वर्षा बालगोपाल, मुरलीधर दळवी, तानाजी एकोंडे यांनी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा