▫️मख़दुम समाचार▫️
नेवासा (कार्तिक पासलकर) २९.४.२०२३
तालुक्यातील चांदा येथील युवकांनी एकत्र येत चांदपीरबाबा यात्रेनिमित्त शेतकऱ्यांमधे लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. परिसरातील अनेक बैलगाडाप्रेमींनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शर्यतीच्या यशस्वितेबद्दल युवकांचे कौतुक होत आहे. यात्राजत्रांमुळे गावातील सामाजिक वातावरण उत्तम राहून लोक एकजूट होतात, गावाचा विकास होतो.
परंपरागत यात्रा थोडेसे कमिटीने दुर्लक्ष केल्याने गावात यंदा कसलेच समाजप्रबोधन करणारे नाटक, लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचे हागामा भरवला नाही. ही गोष्ट लक्षात येताच युवकांनी स्वतः पुढाकार घेत गावात वर्गणी जमा करून यात्रेनिमित्त युवकांनी एकत्रित येऊन प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. पंचक्रोशीतील बैलगाडा प्रेमींनी यात सहभागी होऊन प्रथमच गावातील युवकांना या शर्यतीसाठी मार्गदर्शन केले. आलेल्या बैलगाडा मालकांना बक्षिसे देण्यात आली.
◾
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : Beauty with Brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कलावार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
إرسال تعليق