जो बेचना हैं बेचो, सब कूछ वापस ले लेंगे !के चंद्रशेखर राव यांचे केंद्र सरकारला आव्हान


◽ मख़दुम समाचार ◽
छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद (कार्तिक पासलकर)  २६.४.२०२३
    येथे नुकत्याच झालेल्या सभेत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर उर्फ के. चंद्रशेखर राव यांची सभा संपन्न पडली. सभेला लाखो लोक उपस्थित होते. या सभेत जनतेला संबोधित करताना के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. 'बेच के खाओ' या धोरणांचे त्यांनी यावेळी वाभाडे काढले.
    तुम्ही आता कितीही खाजगीकरण करा, आम्ही सत्तेवर येताच त्याचे सरकारीकरण करू असे आव्हान त्यांनी मोदींना दिले.
त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारवरही त्यांनी ताशेरे ओढले. वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या, अवकाळी गारपीटीबाबतीत सरकारी अनास्थेमुळे केसिआर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनाही खडे बोल सुनावले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात तुमचे काय काम, तेलंगणा सांभाळा असे के सि राव यांना आव्हान दिले होते, त्यावरही जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकरी आत्महत्या थांबवा, तेलंगणाचे मॉडेल जसेच्या तसे महाराष्ट्रात राबवा, मग मी महाराष्ट्रात येणार नाही, असे म्हणून महाराष्ट्र सरकारला ठणकावून सांगितले.
   अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील युवकनेते ओंकार बडाख पाटील हे आपल्या शेकडो सहकारी कार्यकर्ते यांच्यासोबत सभेला उपस्थित होते तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. महिला व तरुणांचा यात लक्षणीय सहभाग होता. त्यांच्यासमोर बोलताना तेलंगणातील उपाययोजनांची जंत्री मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मांडली. रयतू बंधू, दलित बंधू, शेती क्लस्टर योजना, शेतकरी गृह, गरोदर महिलांना केसिआर किट, लग्नासाठी शादी मुबारक किट, वीज आणि पाणी २४ तास, तेही मोफत, सिंचनाचे यशस्वी जाळे अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
     सभेसाठी आमदार जीवन रेड्डी, खासदार बी. बी. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी, बिआरएस पक्ष समन्वयक प्रा. विजय मोहिते, दशरथ सावंत, बी.जे. देशमुख, ज्ञानेश वाकुडकर, सोमनाथ थोरात, गणेश कदम, बाबाराव कदम, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
    या संपुर्ण सभेचे नियोजन चिकटगावकर, संतोष माने, फिरोज पटेल यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी केले. 





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा