◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (सा. सु.) २६.४.२०२३
अहमदनगर महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. माया उंडे यांना ग्लोबल फाउंडेशन सोलापूर, यांच्याकडून दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नुकताच मुधोजी कॉलेज, फलटण येथे पॅन्जिया आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदे दरम्यान सीनियर प्रोफेसर धर्मश्री, केलेनिया विद्यापीठ, श्रीलंका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार प्रोफेसर डॉ. माया उंडे यांना मिळाल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालय व भूगोल विभागाच्या वतीने प्राचार्य आर. जे. बार्नबस सर यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अहमदनगर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सय्यद रज्जाक, डॉ. नोएल पारगे, डॉ. प्रितमकुमार बेदरकर, रजिस्ट्रार दीपक आल्हाट, डॉ. शरद बोरुडे, डॉ. माधव जाधव, प्रा. अजय काकडे व प्रा. दादासाहेब जवरे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयात काम करत असतानाच भूगोल विषयातील भरीव योगदानाबद्दल मिळालेल्या या पुरस्काराबद्दल डॉ. उंडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
إرسال تعليق