नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार राखीव दिवशी; आधीची तिकिटे उद्या वैध असतील. तिकीटे सुरक्षित ठेवण्याची केली विनंती!


▫️मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २९.५.२०२३
    चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी दि. २८ मे रोजी पावसामुळे होऊ शकला नाही.  आता सोमवारी दि. २९ मे रोजी  राखीव दिवशी विजेत्याचा निर्णय होणार आहे.  संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही.  पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले.  दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.

अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही.  रात्री ११ वाजता पाऊस उशिरा थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागेल.  त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती.  दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला.  आता तो सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून राखीव दिवशी खेळवला जाईल.  

रात्री नऊ वाजता पाऊस थांबला होता आणि मैदान जवळपास खेळण्यायोग्य झाले होते, पण पाऊस पुन्हा आला.  त्यानंतर रात्री ११ वाजता पाऊस थांबला. 

आयपीएलने या सामन्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.  त्यांनी लिहिले की, आयपीएलची फायनल २९ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना राखीव दिवशी होणार आहे.  आजची तिकिटे उद्या वैध असतील.  आम्ही तुम्हांला तिकीट सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा