डॉ.अजित लावरे व डॉ.मनोज वाघ यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड !


▫️मख़दुम समाचार▫️ 
अहमदनगर (विजय मते) १४.५.२०२३
    महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमामधील तरतुदीनुसार विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.डॉ.अजित रामभाऊ लावरे व प्रा.डॉ.मनोज पांडूरंग वाघ यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील ‘इलेक्ट्रीकल व सिव्हील विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.
    डॉ.अजित रामभाऊ लावरे व डॉ.मनोज पांडूरंग वाघ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय पी. नाईक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.
     या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन, महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ. सुजय विखे पाटील, प्रभारी सेक्रेटरी जनलर डॉ.पी.एम.गायकवाड यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.






🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा