कोलकाता पाच धावांनी विजयी; सनरायझर्सचा सहावा पराभव


▫️मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) ५.५.२०२३
 आयपीएल २०२३ च्या ४७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती. चेंडू सामनावीर वरुण चक्रवर्तीच्या हातात होता आणि अब्दुल समद समोर होता.  येथे वरुणने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्याला मिस्ट्री स्पिनर का म्हणतात.  त्याने तिसऱ्या चेंडूवर समदला (२१) बादच केले नाही तर षटकात फक्त तीन धावा देऊन कोलकाता नाईट रायडर्सला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

कर्णधार नितीश राणा (४२) आणि रिंकू सिंग (४६) यांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीमुळे कोलकाताने नऊ बाद १७१ धावा केल्या. हैदराबादला ३० चेंडूत ३८ धावांची गरज होती, पण सनरायझर्सला आठ विकेट्सवर केवळ १६६ धावा करता आल्या.  कोलकाताचा हा चौथा विजय ठरला.

१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मयंक अग्रवालने ११ चेंडूत १८ धावा करत हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली, मात्र तिसऱ्याच षटकात तो हर्षित राणाचा बळी ठरला.  अभिषेक शर्मा (९) ही लवकर बाद झाला.  राहुल त्रिपाठीने सहाव्या षटकात रसेलला दोन चौकार आणि एक षटकार ठोकला, पण त्याच षटकात तो नऊ चेंडूत २० धावा काढून बाद झाला.  पुढच्याच षटकात हॅरी ब्रूक (०) बाद झाल्यानंतर हैदराबादची धावसंख्या ४ बाद ५४ अशी दयनीय झाली. त्यानंतर एडन मार्कराम आणि क्लासेन यांनी डाव सांभाळला.  दोघांनी ४७ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली.  क्लासेनने २० चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या.  त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. हैदराबादला शेवटच्या ५ षटकात ३८ धावांची गरज होती.  कर्णधार मार्कराम आणि अब्दुल समद दोघेही संघाला सहज विजयाकडे नेतील असे वाटत होते, पण इथे मार्कराम वैभव अरोराच्‍या चेंडूवर विचित्र फटका मारून लाँग ऑफवर झेलबाद झाला.  त्याने ४० चेंडूत ४१ धावा केल्या.  तो बाद झाल्यानंतर हैदराबादला १९ चेंडूत २७ धावा करायच्या होत्या.
 
तत्पूर्वी, केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  मार्को जॅनसेनने रहमानउल्ला गुरबाजला गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्य) बळी बनवले.  त्याच षटकात त्याने व्यंकटेश अय्यरला (७) क्लासेनकडे विकेटच्या मागे झेलबाद केले.  बऱ्याच दिवसांनी खेळायला आलेल्या कार्तिक त्यागीने सलामीवीर जेसन रॉयलाही (२०) तंबूमध्ये पाठवले.  पॉवरप्लेमध्ये केकेआरची धावसंख्या तीन बाद ४९ अशी होती. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी केकेआरची धुरा सांभाळली.  दोघांनी ४० चेंडूत ६१ धावांची भागीदारी केली.  कार्तिक त्यागीने टाकलेल्या दहाव्या षटकात राणाने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. ११व्या षटकात मार्करामने राणाला झेलबाद केले.  राणाने ३१ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. आंद्रे रसेलने १५ चेंडूत दोन षटकार, एक चौकाराच्या मदतीने २४ धावा केल्या, पण तोही १५व्या षटकात बाद झाला.  १५ षटकात केकेआरने ५ विकेट्सवर १२९ धावा केल्या होत्या आणि रिंकू खेळपट्टीवर होता.  मात्र, दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या.  शेवटच्या पाच षटकांत केकेआरने केवळ ४२ धावा केल्या आणि चार विकेट गमावल्या.  शेवटच्या षटकात टी नटराजनने केवळ तीन धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.  रिंकूही याच षटकात ३५ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा