▫️मख़दुम समाचार▫️
सोलापुर (प्रतिनिधी) १७.५.२०२३
जिल्हयातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक म्हणजेच दि चार्टर ऑफ पेशंट राईट्स ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकार आहे. परंतू जिल्हयातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनिष देशपांडे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्याकडे दिली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल मुळे यांच्या धाराशिव येथील पाठपुरावा चे मार्गदर्शन घेऊन तक्रार मागणी करण्यात आली होती की, खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दरपत्रक तसेच रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्णाला प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क यासारखे अनेक रुग्ण हक्काचा या सनदीमध्ये समावेश आहे. तेच रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शासनाच्या सूचना आणि राष्ट्रिय मानवाधिकार आयोगाचा आदेशानुसार लावत नाहीत त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
त्याअनुषंगाने सर्व खाजगी रुग्णांलयांना त्याबाबत या सुचनांचे पालन न केल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येईल अशी सुचना सर्व रुग्णालयाला देण्याचे आदेश महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हाशल्य चकित्सक सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय यांना दिलेले आहेत. अशी माहिती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनीष देशपांडे, बार्शी तालुका अध्यक्ष आकाश दळवी, सचिव प्रमिला झोंबाडे, दादा पवार यांनी दिली आहे.
जर खाजगी रुग्णालय यांनी आदेश पाळला नाही तर खाजगी रुग्णालय बाहेर रुग्णालयाचा परवाना रद्द करा म्हणूण तीव्र आंदोलन करण्यात येइल, असा इशारा मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे, महाराष्ट्र सचिव मनिष रविंद्र देशपांडे यामनी दिला आहे.
إرسال تعليق