ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे माणसातील माणूसपण टिकवुन ठेवणारी कृती: आमदार लहू कानडे

राहुरी: *आई वडिलांचे स्मृती प्रित्यर्थ आख्या गावातील ज्येष्ठांचा सन्मान करण्याची इच्छा व्यक्त करुन तसा उपक्रम राबविणे म्हणजे साहित्यिकातील संवेदनशिलता जागृत असल्याचे लक्षण असून माणसातील माणूसपण टिकवुन ठेवणारी कृती आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,आमदार, कविवर्य लहू कानडे यांनी केले.
चिंचोली ता. राहूरी येथील जाई प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित सत्कार समारंभ व साहित्यिक पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर लोककवी प्रशांत मोरे, लोकसत्ता संघर्ष चे संपादक प्रकाश साळवे,साहित्यिक भास्कर निर्मळ,सौ. छायाताई भोसले, प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, कवियित्री चंद्रकला आरगडे, प्रभंजन कनिंगध्वज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशांत मोरे म्हणाले की,'आयाबायंच्या सुरकुतल्या हाताचा स्पर्श कोणत्याही तिर्था पेक्षा सर्वश्रेष्ठ असुन चिंचोलीतील एकोपा पाहून आनंद वाटत आहे, कृतिशील साहित्यिकांची वणवा जाणवत असताना भोसले बंधूंनी केलेला जेष्ठ नागरिक आणि साहित्यिकांचा सत्कार सोहळा प्रेरणादायी राहिलं. तापत्या उन्हात मायेची छाया देणारी ही सावली ज्येष्ठांना उर्वरित आयुष्य जगताना कायम स्मरणात राहील'.
   भास्कर निर्मळ यांनी साहित्यिक पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद करून पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे कौतुक केले. यावेळी लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते धोंडीराम गणु भोसले स्मृती सामाजिक वाड:मय पुरस्कार सुनील गोसावी यांच्या आठवणींचा डोह, अनुसया धोंडिराम भोसले स्मृति  वाड्:मय पुरस्कार चंद्रकला आरगडे यांच्या स्री जाणवेच्या ग्रामीण कवितेतील विशेष कार्याबद्दल तर  रामचंद्र मांजरेकर स्मृती वाड्:मय पुरस्कार चंद्रकांत पालवे यांच्या मोहोर उजेड वाटांवर या कवितासंग्रहाला देण्यात आला.जाई पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कानिंगध्वज यांना देण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले, आईच्या नावावरून जाई प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून दरवर्षी गावातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असून अशाच स्मृती जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल.
सत्काराला उत्तर देताना पुरस्कार प्राप्त साहित्यिक सुनील गोसावी म्हणाले की आमच्यासाठी हे पुरस्कार प्रेरणादायी असून आम्ही ते नम्रपणे स्वीकारत आहोत, ग्रामीण भागात दिसून येणार प्रेम शहरात वाढत्या धावपळीमध्ये दिसून येत नाही, गावचे गावपण टिकवुन ठेवणारी ही कृती आहे, म्हणून हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.यावेळी चंद्रकला आरगडे यांनी कवितांचे वाचन केले. तर प्रकाश साळवे, प्रभंजन कानिंगध्वज यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बाळकृष्ण भोसले यांनी केले तर शेवटी आभार रसिका भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.अशोक कानडे,नवजीवन प्रतिष्ठान चे राजेंद्र पवार, शब्दगंध च्या राज्य संघटक कवयित्री शर्मिला गोसावी, बबनराव गिरी,बाळासाहेब मुंतोडे यांच्या सह बारागाव नांदूर व चिंचोलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र भोसले यांनी परिश्रम घेतले. 
ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आमदार लहू कानडे यांनी मंचकावरून खाली येत ज्येष्ठ नागरिकांच्या जवळ जाऊन केला. त्यावेळी  'माणसा इथे मी तुझे गीत गावे' व 'वंदन माणसाला' या गाण्याच्या ध्वनीमुद्रिका वाजविल्या जात असल्याने खऱ्या अर्थाने हा सोहळा संस्मरणीय झाला.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा