▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) १९.५.२०२३
येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर विठ्ठलराव शंकरराव सुद्रिक (वय १०१) यांचे आज शुक्रवारी दि. १९ मे रोजी सायंकाळी निधन झाले. येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात प्रसिद्धी वकिल अॅड. सतीशचंद्र व नेत्रतज्ञ डॉ.उमेशचंद्र ही दोन मुले व दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिध्द आयुर्वेदिक डॉक्टर अंकुश सुद्रीक यांचे ते आजोबा होत.
अंत्ययात्रा शनिवारी दि. २० मे रोजी सकाळी सर्वोदय कॉलनी येथून निघेल. अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Post a Comment